अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीकडून कोरोना पिडीत कुटुंबाना मदत देण्यासाठी कोअर कमिटीची स्थापना…! – श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर सर, कुसुंबा

       धुळे -   येथे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीची ऑनलाईन मिटींग  नुकतीच अध्यक्ष माधवराव जानकीराम बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात त्यांनी कोरोना पिडीत कुटुंबाना मदत निधी पुरविण्यासाठी कोअर कमिटीची स्थापना केली.

      कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी सुरेश शिवराम महाले,  मुंबई-ठाणे-कोकण विभाग प्रमुखपदी मोहन हिरालाल बडगुजर, प्रसिद्धी प्रमुखपदी  राजेंद्र भालचंद्र बडगुजर व प्रा.एच.आर. बडगुजर, मध्यप्रदेश विभाग प्रमुखपदी हिरालाल गुलाबराव दोडे, नाशिक-पुणे विभाग प्रमुखपदी सतीश दिगंबर बडगुजर, महिला प्रतिनिधी सुनंदाताई विष्णू बडगुजर, गुजरात विभाग प्रमुखपदी मोहन वसंत बडगुजर, नंदुरबार विभाग प्रमुखपदी दिलीप राघो बडगुजर यांची निवड करण्यात आली.

      कोरोनाला हरविता हरविता कोरोनासोबत जगण्याची जिद्द बाळगणाऱ्या समाज मनावर दुसऱ्या लाटेने प्रचंड आघात केले. काही कुटुंबातून कर्ता पुरुष गेला, कोणी बाप गमावला तर कोणी आई..!

      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहींच्या नोकरी-व्यवसायावर गदा आली तर काहींना हाता - तोंडाचा मेळ बसविणे अवघड झाले. अशा कुटुंबासाठी समाजातील अनेक घटक आपापल्या परीने सहकार्याची भावना जोपासत आहेत.

      अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीने देखील यासंदर्भात समाजातील गरजू कुटुंबांना मदत पोहोचविण्यासाठी कोअर कमिटीची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत समाजातील दानशूर व्यक्तींच्या सौजन्याने ही कमिटी सदिच्छादूत म्हणून मदतनिधी पोहोच करणार आहे.

      थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग महासागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते. ही धमक निर्माण करून आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी जागा निर्माण करण्याचा हा एक महासमिरीचा सकारात्मक प्रयत्न राहील...!

      अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, विविध समित्यांचे सदस्य  यांनी गरजू कुटुंबांचा सर्व्हे करून  माहिती कोअर कमिटीकडे पाठवावी, असे आवाहन अध्यक्ष माधवराव बडगुजर यांनी केले आहे.

      या सामाजिक उपक्रमाला हातभार लावण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी महासमितीच्या खालील अकाऊंटवर ऑनलाईन किंवा चेकद्वारे निधी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कोअर कमिटीने केले आहे.

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती खाते नंबर : Bank Name : बॅक ऑफ महाराष्ट्र
Account No. : 60093457857
IFSC कोड : MAHB0001161

सदर उपक्रमास बडगुजर समाजातील दाणशूर व्यक्तींनी मदतीचा ओघ सुरू केला असून ज्यांना शक्य असेल त्यांनी मदत करावी.

*अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती*
*करोना मदत निधीसाठी मदतीचा ओघ सुरु*

       दातृत्व हे अंगी असावे लागते. महासमितीने स्थापन केलेल्या स्कोअर कमेटीने करोना मदत निधीसाठी देणगीची सुरुवात स्वतःपासून केली. ते पाहून समाजातील दानशूर व्यक्तींनी महासमितीच्या खालील अकाउंटवर देणगीची सुरुवात करुन श्री गणेशा केलेला आहे.
     समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने समाजातील खालील दानशूर बांधवांनी महासमितीकडे मदत सुरू केली आहे. ज्या समाज बांधांना करोना मदत निधीसाठी मदत करायची असेल त्या समाज बांधवांनी महासमितीच्या खालील अकाउंट नंबरवर देणगी द्यावी अशी विनंती महासमितीच्या स्कोअर कमिटीने केली आहे.

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती खाते नंबर बँक ऑफ महाराष्ट्र जळगांव शाखा .
60093457857
IFSC Code MAHB0001161

*??? भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या आव्हानास समाज बांधवांतर्फे उत्कृष्ट प्रतिसाद*

*अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती*
                 *“करोना मदत निधी”*

*श्री.सुरेश शिवराम महाले, भुसावळ   ११०००*
*श्री.उमेशआप्पा हिरालाल करोडपती ११०००*
*श्री माधवराव जानकीराम बडगुजर,वर्षी*
                                                         *५०००*
*श्री मनोहर बंशीलाल बडगुजर , धुळे    ५०००*
*श्री भगवान लक्ष्मण बडगुजर , पनवेल  ५०००*
*श्रीमती सुनंदा विष्णु बडगुजर,बोराडी   ५०००*
*श्री.विकास पुंडलिक बडगुजर जळगाव ५०००*
*श्री हिरालाल गुलाब दोडे , बुऱ्हाणपूर    २१००*
*श्री रविंद्र मोहन बडगुजर ,शहादा         ११००*
*श्री पंडीतराव शंकर बडगुजर बोराडी    २०००*
*श्री.ज्ञानेश्वर मोरडीया(बडगुजर)कल्याण११००*
*श्री.एस.एम.बडगुजर डोंबिवली.          ११००*
*श्री.भालचंद्र वामन बडगुजर पनवेल.   ११००*
*श्री.बापु किसन बडगुजर कल्याण        ५५५५*
*सौ.स्वाती दिलीप बडगुजर अमरावती   ११००*
*श्री.ईश्वर हरचंद बडगुजर*
         *संपादक बडगुजर समाजदूत      २१००*
*श्री.राजेंद्र भालचंद्र बडगुजर कुसुंबा     २१००*
*श्री.पी.डी.बडगुजर सर जळगाव          २१००*
*श्री.लीलाधर दत्तात्रय बडगुजर जळगाव२१००*
*बडगुजर समाज सरस्वती मिशन*
      *बहुउद्देशीय संस्था,पाचोरा             ११००*
*श्री.भिला गिरधर बडगुजर जळगाव   ११००*
*श्री.मोहन हिरालाल बडगुजर डोंबिवली ५१११*
*श्री.भगवान गंगाराम बडगुजर पुणे.     ११००*
*श्री.रवींद्र संतोष बडगुजर शिंदखेडा     २१००*

2 Comments

Leave a Reply to Vitthal badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*