व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन महत्वाच्या बाबी – श्री. कैलास भाऊलाल बडगुजर, टिटवाळा

व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन महत्त्वाचे मुद्दे….

? व्यक्तिमत्व विकास ही माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी अखंड प्रक्रिया असते.

? व्यक्तिमत्व विकास हा केवळ शिक्षणाने होत नसून संस्कार व अनुकरणाने होत असतो.

? व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन मनन, चिंतन आणि अनुकरण हे टप्पे महत्त्वाचे ठरतात.

? व्यक्तिमत्व विकासासाठी भाषा विकास होणे आवश्यक असते आणि त्यासाठी वाचनाची आवश्यकता असते.

? व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थी शिक्षक व पालक हा त्रिकोण सदृढ असावा लागतो.

? केवळ शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास होत नसून त्या बरोबर इतरही अनेक बाबींची आवश्यकता असते.

? शैक्षणिक अभ्यासक्रम यासोबत आपल्या सभोवतालचा परिसर, निरीक्षण, आकलन आणि वर्तन याचा व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होत असतो.

? व्यक्तिमत्व विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक असतात. केवळ शाळा व शिक्षक यांच्यावर अवलंबून राहून चालत नाही तर विद्यार्थ्याने स्वतः त्याकरता प्रयत्न करणं आवश्यक असते.

? जीवनाचे ध्येय हे व्यक्तीमत्व विकासाच्या पायाभरणी साठी महत्त्वाचे ठरते.

? या व अशा अनेक मुद्द्यांचा व्यक्तिमत्व विकासासाठी विचार करावा लागतो……. कुणाला जर याविषयी काही प्रश्न असतील तर त्यांनी आपले प्रश्न कमेंट्स बॉक्स मध्ये टाकावेत. धन्यवाद.

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर, टिटवाळा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*