इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (IIFT), दिल्ली येथे एम. बी. ए. – इंटरनेशनल बिझनेस फॉरेन ट्रेड या कोर्स साठी कु. ऐश्वर्या सतीश बडगुजर हिचा प्रवेश निश्चित – प्रा. मिलिंद बडगुजर, जळगांव

IIFT संस्थानात सुद्धा बडगुजरांचा बोलबाला……

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (IIFT), दिल्ली येथे एम. बी. ए. – इंटरनेशनल बिझनेस फॉरेन ट्रेड या कोर्स साठी कु. ऐश्वर्या सतीश बडगुजर हिचा प्रवेश निश्चित

ठाणे येथील श्री. सतीश सुकलाल बडगुजर व डॉक्टर सौ. वैशाली सतीश बडगुजर यांची सुकन्या कु. ऐश्वर्या हिची आय आय एफ टी म्हणजे ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ) भारतीय विदेश व्यापार संस्थान च्या दिल्ली कॅम्पस मध्ये एमबीए इंटरनॅशनल बिजनेस फॉरेन ट्रेड या दोन वर्षाच्या कोर्ससाठी निवड झाली आहे .

आय आय एफ टी म्हणजे ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ) भारतीय विदेश व्यापार संस्था ही भारत सरकार तसेच डब्ल्यू टी ओ (World Trade Organization) म्हणजे जागतिक व्यापार संघटना मार्फत चालविली जाणारी एकमेव अशी ही संस्था असून या संस्थेमध्ये कु. ऐश्वर्या बडगुजर हिची निवड होणे हे समाजासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. जागतिक व्यापार संघटने मध्ये भारतीय शासनामार्फत पाठविले जाणाऱ्या प्रतिनिधींची निवड दिल्लीच्या याच कॉलेजमधून केली जात असते .

आय आय एम सारख्या कोर्समध्ये अनेक जण पात्र होत असतात. परंतु देशातल्या पहिल्या तीन आय. आय. एम. च्या बरोबरीत मान असलेल्या या आय. आय. एफ. टी. संस्थेत एका बडगुजर मुलीची आणि ती सुद्धा प्रथमतः निवड होणे, ही समाजासाठी निश्चितच कौतुकाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडित असलेल्या देशी-विदेशी संस्था तसेच विविध कंपन्यांमध्ये या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मोठी संधी प्राप्त होत असते.

कु. ऐश्वर्या सतीश बडगुजर, मुंबई

कु. ऐश्वर्या हिचे वडील श्री. सतीश सुकलाल बडगुजर हे एअर इंडिया या भारतीय विमान सेवेमध्ये सिनियर असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून 1990 पासून कार्यरत आहेत. तर आई डॉक्टर सौ. वैशाली सतीश बडगुजर ह्या बी. ई. एम. एस्. असून सद्गृहिणी आहेत. तर भाऊ कु. रोहन हा बी. टेक. करून एल अँड टी इन्फोटेक कंपनी ऐरोली येथे कार्यरत आहे. श्री सतीश बडगुजर यांनी आतापर्यंत जगभरामध्ये 36 विविध देशांना भेट दिलेली आहे. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा ही परकीय देशात कुठल्याही बैठकीसाठी जातात तेव्हा श्री सतीश बडगुजर हे त्यांच्या व्हीव्हीआयपी क्रू चे इन्चार्ज म्हणून काम पाहत असतात. घरातील वातावरण हे अगोदरपासूनच उच्च सुशिक्षित व सुसंस्कृत असल्याने ऐश्वर्याला लहानपणापासूनच मोलाचे मार्गदर्शन प्राप्त झाले.

ज्या वयामध्ये सातवी आठवी ची मुले मुली लपंडाव सारीपाट लंगडी खेळत असतात. त्या वयामध्ये ऐश्वर्याला वाचनाची गोडी लागली आणि वाचनाशी जडले नाते…….
मग तिथे उणे काय ते पुरते….

या उक्तीप्रमाणे ऐश्वर्याने सातवी आठवी मधेच इंग्रजी साहित्याचे वाचन सुरू केले या बालवयातच शेक्सपियर ची अर्ध्यावर ची नाटके मूळ इंग्रजी भाषेतील तिने वाचून काढली. तसेच Dan Brown, Sidney Sheldon, Jane Austen, Jeffrey Archer यांची
The Da Vinci Code, Pride and Prejudice, The Palace of Illusions, If Tomorrow Comes, The Pelican Brief, Not a Penny more not a Penny less अशी पुस्तके वाचलेली आहेत. याचाच फायदा तिला पुढील काळामध्ये झाला म्हणतात ना की,…..

वाचनानेच मनुष्य परिपूर्ण होतो………….
तीच तर ही परिपूर्णता असावी.

एखाद्या मोठ्या कॉलेजमधील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकाचे इंग्रजी साहित्याचे वाचन जेमतेम 100 पुस्तकाचे असावे, परंतु ऐश्वर्या याही पलीकडे गेली तिने जवळपास दीडशे ते दोनशे भारतीय तसेच विदेशी इंग्रजी साहित्यिकांची पुस्तके वाचून काढली आहेत. अलीकडे वाचन कमी झालेल्या समाजातील सर्व विद्यार्थी , थोर, तरुणांनी ऐश्वर्या कडून वाचनाची प्रेरणा नक्कीच घ्यावी………..

असे म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात….

आणि झाले तसेच….
ठाण्यातील हिरानंदानी कॉलेजमध्ये बारावीत असतांंना कॉम्प्युटर सायन्स या विषयात ऐश्वर्या संपूर्ण भारतातून पहिली आली. के जे सोमय्या इंजिनीरिंग कॉलेज विद्याविहार, मुंबई येथे आय. टी. या विषयात तिने डिस्टिंक्शन मिळवून बी. टेक. पूर्ण केले. याच कामगिरीच्या जोरावर तिला ओरॅकल लिमिटेड, गोरेगाव मुंबई येथील कंपनीत सिनियर असोसिएट कन्सल्टंट म्हणून नोकरी मिळाली 2018 पासून या कंपनी ती कार्यरत आहे. परंतु एवढ्यावर समाधान मानेल ती ऐश्वर्या कुठली. तिला अजूनही खूप मोठे ‘” शैक्षणिक ऐश्‍वर्य ‘” प्राप्त करावयाचे होते. गलेलठ्ठ पगारावर समाधान न मानता एमबीए करण्याचे तिने ठरविले.

आय आय एफ टी दिल्ली येथे एम. बी. ए. आणि तेही भारतीय विदेश व्यापार संस्थान दिल्ली येथे करण्याचे सौभाग्य तिला लाभले यासाठी तिची अभ्यासू वृत्ती व वाचन निश्चितच कामास आले या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी “चार ” प्रकारच्या पात्रता परीक्षेच्या राऊंड मधून जावे लागते. संपूर्ण भारतातून जवळपास 1,20,000 एवढ्या विद्यार्थ्यांमधून कु. ऐश्वर्या हिचा सतरावा नंबर आला. हे निश्चितच तिच्या कुटुंबासाठी आणि बडगुजर समाजासाठी अभिमानास्पद अशी बातमी आहे. हा संपूर्ण अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून या कॉलेजमधूनच भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विदेशी जे व्यापार चालतात त्यासाठी जे प्रतिनिधी निवडण्यात येतात त्यात या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फार मोठी मागणी आहे.

कु. ऐश्वर्या सतीश बडगुजर, ठाणे

रॉबर्ट फ्रॉस्ट च्या कवितेतील ओळी प्रमाणे……
The Woods are lovely, dark and deep। But I have promises to keep। And miles to go before I sleep…………………………………. And miles to go before I sleep…………………..

या कवितेतील ओळीनुसार ऐश्वर्याला यापुढेही मजल गाठायची आहे. येणाऱ्या भावी काळात तिने भारताच्या परराष्ट्रीय व्यापार संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करावे यासाठी आज पासून नव्हे आत्तापासूनच तिला संपूर्ण बडगुजर समाजाच्या वतीने , अखिल भारतीय बडगुजर युवक समितीच्या वतीने आणि बडगुजर प्राउड ग्रुप च्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा……………… यशस्वी भव !….शुभम भवतु…….

एक नवीन वाट निवडणाऱ्या आणि आय आय एफ टी दिल्ली येथे संपूर्ण बडगुजर समाजातून पहिल्यांदाच निवड झाल्याबद्दल कुमारी ऐश्वर्या हिला बडगुजर समाजाच्या वतीने हा मानाचा मुजरा…….?????? Hats off to you????And Best Of LUCK…. आपल्या भावी वाटचालीसाठी.

शब्दांकन:- प्रा. मिलिंद बडगुजर जळगाव ( 9421184495 )

29 Comments

  1. कु. ऐश्वर्या सतीश बडगुजर हीचे खूप कौतुक व अभिनंदन. तसेच तिचे आई व वडील यांचे विशेष अबिनंदन

  2. खूपच कौतुकास्पद कामगिरी ????
    पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा ??

  3. अप्रतिम यशाची मानकरी असलेल्या सुकुमारी ऐश्र्वर्या सतिश बडगुजर-ठाणे,दीदीचे व आदरणीय मातापित्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
    माननीय प्रा.श्री मिलिंद बडगु्जर सर-जळगाव आपण खुप माहितीपूर्ण असा वैचारिकतेची प्रेरणादायी छाप असलेला नितांतसुंदर असा लेख लिहिला.
    चांगली सकारात्मक माहिती दिल्याबद्दल बडगुजर वेब पोर्टल टिम चे आभार! धन्यवाद.
    /डॉ दिलीप-सौ.स्वाती बडगुजर, अमरावती

    • धन्यवाद डॉक्टर साहेब आपल्यासारख्यांच्या प्रेरणेमुळे लिहिण्याची स्फूर्ती मला मिळत असते आपल्यासारख्यांचा अभिप्रायामुळे आमचा ऊर भरून येतो

  4. Proud moment for Badgujar Samaj
    Congratulations Aishwarya ????

  5. आजीआजोबाचे नांव उजविलं |
    मम्मापप्पाचं नांव गाजविलं ||
    कौतुकास्पद कामगिरीने जनमानसात प्रतिमा आकारली |
    ऐश्वर्या नावानुरूप अलोणे-पढ्यार परीवाराची किर्ती साकारलीll

    Proud of you Dear Aishwarya..Hearty Congratulations n keep it up.
    Congratulations Dear Satish n Sau, Vaishali.
    May almighty god bless you all n shower same spirit hereafter too….

  6. Thank you ??-
    *Milind Badgujar Sir,*
    You have an art of expression/presentation, Craft it.It will Excel you to new positions.

    *Dear Lokesh Kotwal,*
    Appreciate your fervency & solicitude about community/society.

    *Dear Aishwarya didi,*
    Use your Knowledge, Experience, Family values & Social ethics to generate energy, decision & strength. MBA in International Business at IIFT Delhi will give you wide & powerful wings to propell you to new high from where you will get worldwide ‘A Birds Eye View’ to choose position & organisation.
    I can visualise your future/destination as –
    – Director/VP/President of an organisation of your choice. OR
    – You may lead India at WTO/IMF/ASIAN BK/WORLD BK/Ministry of Comm/Ministry of Fin.
    **** “Sky is the Limit” ****

    Let your success story Inspire younger sibling Rohan & many more in the Community/Society.
    We will always be supportive & behind your decision.

    ….Satish S Badgujar -Air-India
    Dr.Mrs.Vaishali Satish Badgujar
    Rohan Satish Badgujar-L/T Info.

  7. Congratulations to Aaishwarya & Parent ,proud of Badgujar Samaj
    Best Wishes for Future???

    • कुमारी ऐश्वर्या अभिनंद

  8. विजय जगन्नाथ बडगुजर बाळापुर फागणे तालुका जिल्हा धुळे
    June 11, 2021 at 10:33 am

    कुमारी ऐश्वर्या अभिनंदन बेटा तुझे

  9. विजय जगन्नाथ बडगुजर बाळापूर फागणे तालुका जिल्हा धुळे
    June 11, 2021 at 10:52 am

    कुमारी ऐश्वर्या अभिनंदन

  10. विजय जगन्नाथ बडगुजर मुक्काम बाळापुर पोस्ट फागणेतालुका जिल्हा धुळे
    June 11, 2021 at 10:58 am

    Kumari Aishwarya Abhinandan
    कुमारी ऐश्वर्या अभिनंदन

  11. कुमारी ऐश्वर्या अभिनंद

  12. Proud feelings for Aishwarya ad well as her parents. Actually her journey started from her childhood as she sparkled with her glorious activities. This resulted today’s achievement. It is a unique lesson to follow and she is unmatched example. From- Bhanudas Badgujar Ex. Principal Pune.

  13. ??अभिनंदन ऐश्वर्या आपले व आपल्या परिवाराचे??

  14. Proud feelings to us !!!
    Hearty Congratulations Beta Aishwarya !!!
    Best Luck for your future !!!

  15. ???अभिनंदन ऐश्वर्या आपले व आपल्या परिवाराचे व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा???

Leave a Reply to प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*