नव-कविता ‘मळभ’ – सौ . माधवी बडगूजर

नव-कविता ‘मळभ’ – सौ . माधवी बडगूजर

आकाशात ढग काळे होवून येतात
सोबतीला मन हे वाहुन नेतात

आठवणींच्या हिंदोळ्यावर मन हे झुलते
फुलपाखरू बनून ..भिरभिरते

एक एक आठवणी डोळ्यासमोर फिरतात
काळोखी जंगलात जसे काजवे चमकतात

आता आता तर बाजूला होतास इथे
मागे वळुन पाहता आढवणी उरल्यात तिथे

सुन्न करणाऱ्या एकांतात तुला आठवत बसते
डोळ्यातील सुनामीला बांध मोकळा करते

पण अता ठणकावून सांगितले मनाला
… शहान्या सारख वागायचं
मळभ कितीही दाटून आला तरी
मनाला नाही वाहू द्यायच .

-‌सौ . माधवी बडगूजर, अलिबाग

1 Comment

Leave a Reply to Kailas Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*