ओझर : भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे केवळ स्वामी समर्थांनी सांगितले आहे असे नाही तर घरातील आजीने सांगितले आणि नातवांने ऐकले. त्यातून घरातील हलाखीची परिस्थिती असतांंना देखील मिळेल ते शिक्षण घेऊन एअर फोर्स ची नोकरी स्वीकारली. मी येतो वैभव आणेल प्रमाणे सुरेश बडगुजर नुकतेच निवृत्त झाले. त्यांच्या आयुष्याचा हा काहीसा लेखाजोखा अनेकांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.

सुरेश राघो बडगुजर हे मूळचे नंदुरबार शहरातील राहणारे आहेत. अ. भा. ब. स. युवक समिती अध्यक्ष श्री. दिलीप राघो बडगुजर यांचे ते मोठे बंधु आहेत. एअर फोर्सच्या नोकरी निमित्ताने अनेक राज्यात ते राहिलेत साध्य ओझर येथे स्थायिक झाले. 1 जुन 1961 ही त्यांची जन्मतारीख. डिप्लोमा इन मेकॅनिकल अँड बॅचलर ऑफ आर्ट असे शिक्षण त्यांनी घेतले. कमल आजीनी शिकायची उमेद दिली आणि ते शिकत गेले तसे पाहता भिकूबाई आई राघो वडील आणि घरातील परिस्थिती हलाखीची होती मात्र त्यातही आपण काही तरी करून दाखवावे आणि यश मिळावे आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला ही आर्थिक दृष्ट्या सक्षम करावे प्रबळ करावे हा हेतू मनात ठेवून सुरेश बडगुजर यांनी वाटचाल सुरू केली. 1 ऑक्टोंबर 1980 ला एअर फोर्स जॉईन केले. चेन्नई येथे दोन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. 1982 ला प्रथमच पंजाब राज्यात बदली झाली. चिताह चेतक हेलिकॉप्टर चे काम त्यांनी केले. त्यानंतर 1984 ला एअर फोर्स स्टेशन गॉलियर येथे बदली करण्यात आली. तेथे मिराज 2000 फाइटर या विमानावर टेक्निकल काम करण्याची संधी मिळाली. राजकीय पटलावर काही बदल झाले आणि 1989 ला भारतीय शांती सेना श्रीलंका(जाफना) येथे पाठवण्यात आले ते तीन महिने प्रत्यक्ष त्यांनी सहभाग नोंदवला तर 1990 ला गुवाहाटी (आसाम) येथे बदली करण्यात आली . तेथे M J 8, हेलिकॅप्टर ,Dornier, AVRO विमानावर स्ट्रक्चरल रिपेअर चे काम केले. गुवाहाटी येथे असताना नागालँडची राजधानी कोहिमा येथे विमानाचे काम करण्याची संधी मिळाली. 1994 एअर फोर्स स्टेशन बिदर कर्नाटक येथे बदली झाली या ठिकाणी पायलट ट्रेनिंग सेंटर आहे तेथे Kiran Mk-1 आणि Mk-2 विमानावर सर्विसिंग चे काम करण्याची संधी मिळाली. वीस वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण करून 30 सप्टेंबर 2000 ला येथून सार्जंट या पदावरून सुरेश बडगुजर सेवानिवृत्त झाले.
एच ए एल ओझरमिंग नाशिक कंपनीमध्ये एप्रिल 2002 पासून पुन्हा सेवेत रुजू झाले त्याचे सीनियर चीप सुपरवायझर म्हणून कार्यरत होते एच ए एल नाशिक येथे मीग 21,मिग 27 यांचे ओव्हरहॉल चे काम केले त्यानंतर SU-30 फायटर विमानाचे नवीन पाईप टाईप चे काम देखील केले इतर तांत्रिक कामे केलीत एच ए एल ओझर कंपनी येथे 19 वर्ष सेवा केली 31 मे 2021 ला नियत वयोमानाप्रमाणे निवृत्त झाले ओझर मिग येथे सध्या त्यांनी घर बांधले असून तेथे स्थायिक झाले आहेत.
नंदुरबार ही जन्मभूमी असल्याने व प्राथमिक माध्यमिक शिक्षण नंदुरबारला झालेले असल्यामुळे सुरेश बडगुजर यांचे नंदुरबार शी वेगळे नाते आहे. आपल्या कुटुंबाने पुढे जावे समाजातील व्यक्तींनी पुढे जावे यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या दीर्घायू आरोग्यासाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप व बडगुजर डॉट इन परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा


निवृत्ती नंतरचे भावी आयुष्य सुखी समाधानी रहावं अशी श्रीचरणी प्रार्थना
माननीय श्री सुरेश राघो बडगुजर साहेबांना हार्दिक शुभेच्छा!