सुरत येथील कुमारी डॉ. सुषमा राजेंद्र बडगुजर हिचे Saratov State University, Russia मध्ये MBBS च्या ४ वर्षात घवघवीत यश – श्री. सुनिल बडगुजर, जळगांव

सुरतः येथील व्यावसायिक श्री. राजेंद्र दंगल बडगुजर यांची सुकन्या कुमारी डॉ. सुषमा राजेंद्र बडगुजर MBBS पदवी ग्रहणासाठी घोडदौड…….
डॉ. सुषमा Saratov State Medical Univesty, Russia येथे MBBS ४ थ्या वर्षाचे शिक्षण घेणारी समाजातील प्रथम महिला असून,अंतीम वर्षात दिमाखात प्रवेश साकारला आहे.

सुरत येथील सौ.विद्या व श्री. राजेंद्र दंगल बडगुजर यांच्या जेष्ठ सुकन्या डॉ.सुषमा असून श्री. राजेंद्र बडगुजर हे मारूती सेल्स् एजन्सी‘ नामक त्यांचा एफएमसीजी प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूशनचा व्यवसाय आहे. मुलांना योग्य शिक्षण मिळावे असे श्री. राजेंद्र बडगुजर यांची सुरुवाती पासूनच इच्छा व तळमळ होती. डॉ.सुषमा यांनी आपले इ. १०वी व १२वी चे शिक्षण सुरत येथील ज्ञानज्योत या विद्यालयात घेतले, इ.१० वी व १२वी मध्ये घवघवीत यशामुळे व वैद्यकीय शाखेची आवड असलेने, वैद्यकीय शाखेची सुयोग्य निवड केली कारणे डॉ. सुषमा हिने मेडिकल प्रवेश परिक्षेची तयारी केली व रशिया येथील Saratov State Medical University ची ऑनलाईन मेडीकल ची Entrance परिक्षेत यश संपादन करत MBBS साठी आपला प्रवेश निश्चित केला. आणि पहिल्या वर्षापासून यश आता ४थ्या वर्षीही विजयश्री खेचत अंतीम वर्षात दिमाखात प्रवेश साकारला.
डॉ. सुषमा यांना १ बहिण व १ भाऊ आहे. बहिण ही Computer Engg. च्या ३ ऱ्या वर्षाला असून लहान भाऊ १० वी चे शिक्षण घेत आहे. डॉ. सुषमा हिने प्राप्त केलेल्या यशामुळे भावडांना सुध्दा शिक्षणात आवड निर्माण झाली.

कु. डॉ. सुषमा राजेंद्र बडगुजर, सुरत

डॉ.सुषमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.परिवारातील सदस्य सुरत येथील समाज बांधव, बडगुजर युवा संघटन सुरत,अखिल भारतीय बडगुजर समाज सुरत ट्रस्ट,सुरत व बडगुजर.इन टीमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

4 Comments

  1. अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ?????

  2. अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

Leave a Reply to Kailas Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*