पुणे बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी श्री. रतिलाल बडगुजर यांची एकमताने निवड – श्री. अनिल बडगुजर, पुणे

पुणे : बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे यांच्या वतीने सर्व बडगुजर समाज बांधवांना कळवित आहोत की, आपले अध्यक्ष कै. प्रकाशशेठ रघुनाथशेठ बडगुजर यांचे दुःखद निधन झाल्यामुळे पुणे समाजासाठी कार्यकारिणीने दिनांक 16-05-2021 रोजी ऑनलाइन मीटिंग घेऊन त्यात पुढील अध्यक्ष म्हणुन श्री. रतिलाल रघुनाथशेठ बडगुजर यांची सर्वांनी एक मताने निवड केली आहे. तरी यापुढे श्री. रतिलाल रघुनाथशेठ बडगुजर हे बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे चे अध्यक्ष म्हणुन कार्यरत असतील. त्यांच्या सोबत बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे येथील कार्यकारिणी व सर्व समाज बांधव पुढील कार्य चालू ठेवतील.

श्री. रतिलाल शेठ हे पुणे विभागातील सक्रीय सामाजिक कार्यकर्ते आहेत. सदैव ते तत्परतेने गरजू समाजबांधवांना निस्वार्थीपणे मदत करीत असतात.

श्री. रतिलाल बडगुजर, नवनिर्वाचित अध्यक्ष पुणे

माजी अध्यक्ष स्व. प्रकाश रघुनाथ शेठ बडगुजर यांच्या सोबत श्री. रतिलाल शेठ हे नेहमीच कार्यात अग्रगण्य असायचे. स्व. प्रकाश शेठ यांच्या जाण्याने पुणे विभागाचे अध्यक्ष पद रिक्त झाले होते…. रतिलाल शेठ ही प्रकाश शेठ यांनी पुणे विभागात तयार केलेली ऊर्जा आणि प्रभाव यशस्वीपणे पुढे नेतील याच विश्र्वास पुणे मंडळातील सर्व पदाधिकारी व समाजबांधवांना आहे.

तसेच कै. प्रकाशशेठ रघुनाथशेठ बडगुजर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे जेष्ठ पुत्र श्री. राहुल प्रकाशशेठ बडगुजर यांना बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेचे सभासद म्हणुन घोषित केले आहे.

बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणेचे माजी सभासद कै. अर्जुन धुडकुशेठ बडगुजर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर श्री. प्रदीप रघुनाथशेठ बडगुजर (उरुळी कांचन) यांना सभासद म्हणुन घोषित केले आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. रतिलाल शेड बडगुजर, सभासद श्री. राहूल बडगुजर, व श्री. प्रदीप बडगुजर यांचे बडगुजर. इन टिमच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

सर्वांनी घरी रहा सुरक्षित रहा… ??

5 Comments

  1. पुणे बडगुजर समाजाच्या अध्यक्षपदी माननीय श्री रतिलाल बडगुजर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन ते स्वर्गीय प्रकाश रघुनाथ बडगुजर यांचे काम निश्चित पुढे चालू ठेवतील व त्या कामाला पुढे उत्तुंग शिखरावर नेतील असा पूर्ण विश्वास आहे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा शुभेच्छुक बडगुजर समाज मुंबई विभाग माजी सचिव

  2. माननीय श्री रतिलाल र.बडगुजर भाऊसाहेब पुणे आपले अभिनंदन आणि शुभेच्छा!
    /डॉ दिलीप-सौ.स्वाती बडगुजर अमरावती

Leave a Reply to Dr D D Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*