वराडसिम प्रा. आ. केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश आधार बडगुजर ठरताय कोरोना स्पेशालिस्ट – कोरोना काळात रूग्णांना विशेष मार्गदर्शन

कुर्हे पानाचे : वराडसिम आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी (Health Officer) कार्यरत असलेले डॉ. उमेश आधार बडगुजर यांनी कोरोना काळात अनेक रूग्णांना यशस्वी मार्गदर्शन व उपचार देत आहेत. पंचक्रोशीत सध्या डॉक्टर यांच्या या अनमोल कार्यांची विशेष चर्चा आहे.

रूग्णांची कोरोना चाचणी घेतांना डॉ. उमेश

डॉ. हे आधीपासूनच आरोग्य क्षेत्राचे एक सखोल अभ्यासक असून या वैद्यकीय अधिकारी पदासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी घेतलेल्या परिक्षेत डॉ. उमेश आधार बडगुजर हे जळगांंव जिल्हयातुन प्रथम क्रमांकाने ऊत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून वराडसिम येथे पोस्टींग मिळाली.

ग्रामस्थ व आरोग्य कर्मचारी यांनी विशेष मार्गदर्शन करतांना डॉ. उमेश

डॉ. उमेश बडगुजर हे कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील रहिवासी असून श्री. आधार (अशोक सर) बडगुजर सर यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. डॉ. उमेश बडगुजर यांनी आपले BAMS पर्यंत चे शिक्षण चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय, साकेगांव येथून पुर्ण केले. तसेच त्यांचे बंधू श्री. किरण बडगुजर हे शिक्षक आहेत तर दुसरे बंधू डॉ. प्रविण बडगुजर हे दंत विशारद (BDS) आहे.

डॉ. उमेश एक उत्कृष्ट आरोग्य सेवक आहेत. तसेच सामाजिक कार्यात ही त्यांचा अनमोल सहभाग असतो. बडगुजर समाजात तसेच गावात कोणालाही वैद्यकीय मदत लागली तर सदैव तत्पर त्यांना योग्य ती मदत आणि मार्गदर्शन ते करीत असतात.

कोरोना काळामध्ये डॉ. उमेश हे संपूर्ण गावकऱ्यांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शक ठरले. सोबतच गावातील, समाजातील, तसेच मित्र परिवारातील कोणीही सदस्य कोरोना संशयित असल्यास, त्यांना अगदी चाचणी करण्यापासून ते कोरोना मुक्त करण्यापर्यंतचे परिपूर्ण मार्गदर्शन डॉ. उमेश हे करत आहेत. तसेच कुठल्याही पेशंटला जर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायची गरज असेल, ऑक्सिजनची आवश्यकता असेल किंवा औषधे उपलब्ध करायचे असतील तर डॉक्टर सर्वतोपरीने ते उपलब्ध करून देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतात. असे अनेक कोरोना बाधितांना यशस्वी व सुयोग्य मार्गदर्शन डॉ. करीत आहेत. तसेच काही समाज बांधव जे कामानिमित्त इतर गावाला वास्तव्यास आहे त्यांना अडचण असल्यास फोन करून मार्गदर्शन व योग्य सल्ला देत असतात.

कोरोना लढ्यातील महत्वपूर्ण ढाल (PPE Kit)

डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि सहकार्य हे कोरोना रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांचे मनोधैर्य उंचावणारे ठरत आहे. बडगुजर समाजात याची सर्वीकडे चर्चा आहे. कारण प्रत्येक पेशंटला आपल्या परिवारातील सदस्य समजून त्यांना योग्य ती सेवा आणि मार्गदर्शन करत असतात.

त्यांनी कोरोना काळात केलेल्या अनमोल आरोग्य सेवेच्या कार्यास आमच्या अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश आधार बडगुजर, कुर्हे पानाचे

11 Comments

  1. डॉ उमेश आधार बडगुजर यांच्या विशेष आरोग्य सेवेबद्दल मान्यवर लेखक श्री लोकेश कोतवाल यांनी छान लेख लिहिला आहे.
    डॉ साहेब यांचे अभिनंदन./डॉ दिलीप-सौ.स्वाती बडगुजर, अमरावती

  2. डॉक्टर उमेश बडगुजर यांच्या उत्तम आरोग्य सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांच्या कार्यास शुभेच्छा!!

  3. वैद्यकीय सेवा अंतर्गत डॉ उमेशजी बड गुजर यांचे मनपूर्वक अभिनंदन जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा

  4. वैद्यकीय सेवा अंतर्गत डॉ उमेशजी बड गुजर यांचे मनपूर्वक अभिनंदन जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा

  5. I have also called many times to dr. Umesh for his help and suggestions for my friends ans relatives.
    Dr. Umesh is very helpful and gives to the point suggestions.
    God bless him.

  6. Dr Umesh has helped me, my family & friends in dealing with this pandemic. His suggestions have proved life-saving in all the cases. He is a very knowledgeable person.

  7. डॉ उमेश बड गुजर यांनी वैदकिय सेवे मध्ये दिलेल्या योगदाना बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published.


*