औरंगाबाद येथे श्री. नरेंद्र बडगुजर यांनी केले १५ व्या वेळी रक्तदान

गजानन महाराज भवन यांच्या सहकार्याने, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, प्रयास युथ फाऊंडेशन व शासकिय रक्तपेढी, औरंगाबाद यांच्या वतीने महावीर जयंतीच्या पावन पर्वावर भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि.२५/४/२०२१ रोजी सकाळी ८:३० ते दुपारी १:०० या वेळेत गजानन महाराज भवन, गजानन महाराज मंदिरा समोर, गारखेडा परिसर, औरंगाबाद येथे करण्यात आले होते.

या रक्तदान शिबीरात कोरोना संदर्भात असलेले सर्व नियम पाळले गेलेत. सर्व रक्तदात्यांना अल्प उपहार, चहा, बिस्किट, फळे व स्वच्छ पिण्याचे पाणी आशी सोय करण्यात आली. तसेच रक्तदात्यांना रोप देऊन पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज हा संदेश देण्यात आला.

View Post

रक्तदान शिबीरात येत असलेल्या रक्तदात्यांना येतांना व जातांना त्रास होऊ नये याची ही काळजी आयोजन टीम मार्फत घेण्यात आली.

त्याबद्दल सर्व आयोजन टीमचे व रक्तदान करणाऱ्या सर्व समाज बांधवाचे फार फार अभिनंदन..! असेच समाज कार्य आपल्या सारख्या नवयुवकांन तर्फे व सहकारी संस्थानच्या वतीने सदैव घडत राहो या करीता हार्दिक शुभेच्छा..! आई चामुंडा मातेचा अशिर्वाद व साथ सदैव आपल्या पाठीशी राहो.

सद्या परिस्थितीत कोरोना सारख्या आजारामुळे समाजबांधव रक्तदान करत नसल्याने औरंगाबाद मधील व इतर शहरातील रूग्णालयात रक्तपुरवठ्याची कमी भासत असल्याचे समजते तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण पुढाकार घेऊन रक्तदान करावे.

येत्या १ मे २०२१ पासुन १८ वर्षा वरील सर्व व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण झाल्या नंतर काही महिने रक्तदान करता येत नाही, त्यामुळे रक्ताचा तुटवडा जास्त निर्माण होण्याची शक्यता आहे.

मी आज १५ व्या वेळी रक्तदान केले.
?रक्तदान जीवन दान?

संपुर्ण जग कोनोना मुक्त होवो हिच चामुंडा मातेला प्रार्थना..!????

धन्यवाद..!
??????????
श्री नरेंद्र बडगुजर व परिवार

3 Comments

  1. नमस्कार,

    सर्व प्रथम आपल्या समाजातील कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत गमावलेल्या सर्व लहान मोठे समाजबांधव व भगिणी यांना भावपुर्ण श्रध्दांजली..! तसेच कोरोनावर मात करुन सुखरूपपणे घरी आलेल्याला समाजबांधव व भगिणी यांचे अभिनंदन..! व पुढील निरोगी आयुष्याकरीता हार्दिक शुभेच्छा..!??????

    वेब पोर्टल टीमचे व सर्व वाचक समाजबांधव यांचे ही आभार..!

    असेच रकतदान करण्याची संधी सदैव मला आई चामुंडा मातेच्या आशिर्वादाने मिळत राहो..!

    कोरोनाच्या प्रादुर्भावा पासुन वाचण्या करीता…
    नियमित हात धुवा??..
    नाका-तोंडाला-मास्क लावा..
    सुरक्षित अंतर ठेवा ????‍♀️..

    वेळोवळी शासनाने दिलेल्या माहिती व नियमांचे पालन करावे.??..

    धन्यवाद..!
    श्री नरेंद्र सिताराम बडगुजर व परिवार.

  2. रक्तदान श्रेष्ठ दान!
    अभिनंदन नरेंद्र जी.
    /डॉ दिलीप बडगुजर अमरावती

Leave a Reply to Narendra Sitaram Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*