सौ.शुभांगी पराग बडगुजर यांना खान्देश रणरागिणी पुरस्कार जाहीर – डॉ. नितीन बडगुजर,जळगांंव.

जळगांंवः येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.रामदास बंडू बडगुजर यांची कन्या सौ.शुभांगी पराग बडगुजर,यांना केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ चे औचित्य साधून “खान्देशची रणरागिणी” या पुरस्काराचे आयोजन केंद्रीय मानव अधिकार संघटना नवी दिल्ली, जळगाव जिल्हI कार्यकारणी यांनी केले होते.पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील मुंबई,ठाणे,औरंगाबाद,नाशिक, जळगाव,धुळे,नंदुरबार, अकोला, वाशिम इत्यादी जिल्ह्यांमधून ७० च्या वर कर्तुत्ववान महिलांची आवेदने प्राप्त झालीत दिनांक ८ मार्च २०२१ते २० मार्च २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सर्व अर्ज मागविण्यात आले होते. खानदेश हे कार्यक्षेत्र लक्षात घेऊन,संघटनेच्या पुरस्कार निवड समितीने विविध निष्कर्षांचा उपयोग करून, पस्तीस (३५) कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर केला आहे.

केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मिलिंद दहिवले,राष्ट्रीय संघटन सचिव डॉ शिवचरण उज्जैनकर,पुरस्कार आयोजन समितीचे अध्यक्ष व जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ.अजय पाटील, जिल्हा सचिव प्रा.राजकुमार कांकरिया,निवड समिती सदस्य व पदाधिकारी श्री संजय भटकर,प्रा.साधना लोखंडे, श्रीमती ज्योती राणे, श्री किशोर पाटील,श्री अजय पाटील,डॉ.प्रशांत बडगुजर,श्री विनायक वाडेकर,श्री महेंद्र महाजन यांनी पुरस्कार प्राप्त महिलांना शुभेच्छा कळवि असूध,सर्व पुरस्कार प्राप्त कतृत्वशील महिलांचे संघटनेच्यावतीने मनस्वी अभिनंदन व्यक्त केले गेले. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत,पुरस्कार सोहळा हा पुढील महिन्यात होणार आहे.


सौ.शुभांगी पराग बडगुजर यांचे कला व सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा अतिशय मानाचा पुरस्कार जाहीर झालेला असून सौ.शुभांगीताईवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप व वेब पोर्टल टीमतर्फे सौ.शुभांगीताईंचे हार्दिक अभिनंदन.

सौ.शुभांगी पराग बडगुजर

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*