बोईसर येथे सौ. कविता मांडेवाल यांच्या यश मेन्स् वेअरचा उद्या उद्घाटन सोहळा

बोईसर येथे बडगुजर महिला उद्योजकतेची भरारी

बोईसर जिल्हा पालघर येथील श्री. विजय जगन्नाथ मांडेवाल यांच्या धर्मपत्नी महिला उद्योजिका कविता मांडेवाल यांनी गारमेंट्स व्यवसाय अल्पावधीतच यश प्राप्त केले.

पिळोदे तालुका अमळनेर येथील कै. जगन्नाथ शेठ अमृत मांडेवाल यांच्या सून आहेत व माहेर कुर्हे पानाचे येथील श्री रामदास किसन कोतवाल यांची नात कै. रविंद्र रामदास कोतवाल यांच्या त्या कन्या आहेत. त्यांचे पती श्री विजय मांडेवाल बोईसर येथे डी डेकॉर या नामांकित कंपनीत उच्चपदस्थ नोकरीला आहेत. पतीच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने त्यांनी कापडाचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करण्याआधी त्या टेलरिंग व ब्युटी पार्लर चे काम करायच्या. त्यामुळे त्यांचा महिलावर्गाची जास्त संपर्क होता महिला वर्गाची आवड-निवड त्यांना चांगल्या प्रकारे समजल्या होत्या त्यानुसार महिलांच्या गरजा ओळखून त्यांनी कापड व्यवसाय सुरुवात केली. भाग्यश्री वूमन्स वेअर अँड किड्स वेअर नावाने या नावाने महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी कपड्यांचे दुकान सुरु केले. त्यात खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. अतिशय उत्तम प्रकारे भाग्यश्री वुमन वेअर्सचे काम सुरू आहे तसेच कस्टमर बेस वाढल्यामुळे ग्राहकांचे मागण्या लक्षात घेऊन व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी मेन्स वेअर चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. आता आपल्या कापड व्यवसायाची दुसरी शाखा यश मेन्स वेअर बोईसर येथील यश पदमा कमर्शियल कॉम्प्लेक्स, बोईसर येथे दिनांक 14 मार्च रोजी शुभारंभ करणार आहेत यश मेन्स वेअर मध्ये पुरुषांसाठी जीन्स ब्राउझर ट्रॅक पॅन्ट शॉर्ट टी शर्ट शर्ट जीन्स जॅकेट इत्यादी विविध प्रकारचे कपडे विक्रीस उपलब्ध आहेत.

त्यांच्या या नवीन दुकान उभारणीस बडगुजर प्रोटीन च्या हार्दिक शुभेच्छा अशीच यशदायी वाटचाल सुरू राहावी याकरिता खूप खूप शुभेच्छा.

4 Comments

  1. अभिनंदन ???
    तुमच्या नविन शो रूम च्या उद्घाटना प्रसंगी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  2. हार्दीक हार्दीक अभिनंदन.खुप खुप शुभेच्छा

  3. सौ.मांडेवाल ताई आपल्या प्रतिष्ठानास हार्दिक शुभेच्छा.
    बडगुजर वेब पोर्टल टिम आपणा सर्वांचे अभिनंदन!प्रेरणादायी उद्यमशील उपक्रमाची बातमी प्रकाशित केली! / सौ.स्वाती-डाॅ.दिलीप बडगुजर, अमरावती.

  4. अभिनंदन कविता, अशाप्रकारे आपल्या बडगुजर समाजातील तरुनाणी
    व्यावसायची सुरुवात करायला हवी, आपला क्षत्रिय समाज हा पुर्वी व्यासायच करायचे, म्हणून आपण सुद्धा नोकरीच्या मागे न लागता आपणही व्यवसाया कडे वळायला हवं.

Leave a Reply

Your email address will not be published.


*