श्री. विक्रांत पालटशा यांना उत्कृष्ट कॉलेज समन्वयक म्हणून सन्मानित – श्री. चन्द्रकांत पितांबर बडगुजर ऐरोली नवी मुंबई

!! अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७२ व्या वर्धापन दिना निमित्त प्राध्यापक श्री. विक्रांत पालटशा यांना उत्कृष्ट कॉलेज समन्वयक म्हणून सन्मानित करण्यात आले. (Best Collage Co-ardinator) माननीय कुलगुरू श्री. नितीन करमळकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री. सिद्धी विनायक महिला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात आला.
कोरोना संकट काळात विद्यापीठाने विध्यार्थ्यासाठी E-CANTENT विकसीत करण्यासाठी १० महाविद्यालयाची निवड केली त्यामध्ये श्री. सिद्धी विनायक महिला महाविद्यालयाचा समावेश होता. यांत महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी बजावली यात श्री. विक्रांत पालटशा यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
श्री. नितीन करमळकर कुलगुरू, भुषण पटवर्धन अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग,पदमश्री वैद्य कोटेचा व उपकुलगुरु डॉ. श्री.एन. एस. उमरा नी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सविता आठवले यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी करू शकलो. असे मत श्री.प्रा. विक्रांत पालटशा यांनी व्यक्त केले. निवृत्त प्राध्यापक श्री. देविदास अभिमन बडगुजर यांचे सुपुत्र असून समस्त बडगुजर व पिळोदेकराना यांचा सार्थ अभिमान आहे.
श्री.प्रा. विक्रांत पालटशा यांच्या पुढील जीवनात उत्तरोत्तर प्रगती होवो व आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला ग्रुप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा ??

2 Comments

  1. विक्रांत पालट शहा यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा बेस्ट समन्वयक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन
    शुभेच्छुक सुनील मधुकर बडगुजर माजी सचिव

  2. माननीय प्रा.श्री.विक्रांत पालटशा यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
    / डॉ.दिलीप बडगुजर-सौ.स्वाती बडगुजर,
    अमरावती

Leave a Reply to सुनील मधुकर बडगुजर, उल्हासनगर Cancel reply

Your email address will not be published.


*