लोकमान्य मल्टपर्पज कॉ ओ बँक, पुणे तर्फे ऍड. वैशाली भूषण बडगुजर यांचा सत्कार

दि. ८/३/२०२१ रोजी महिला दिनानिमित्त लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑ. बँक शाखा भोसरी पुणे या बँकेचे मॅनेजर यांचे हस्ते भोसरी पुणे येथील ऍड वैशली भुषण बडगुजर यांनी गेल्या 15 वर्षात महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या सामाजिक व कायदेशीर कार्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पती पत्नीच्या कौटुंबीक कलहातुन होणाऱ्या वादातून तोडगा काढत दोन्ही पक्षांना एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व समजावून सांगून त्यांचे प्रयत्नामुळे आजपर्यंत अनेक जोडपी परत सुखाने संसार करीत आहेत. ऍड वैशाली भुषण बडगुजर यांनी दरवर्षा प्रमाणे गेल्या वर्षीसुद्धा ९२ जोडप्यांचा समेट घडवून परत नांदायला पाठवली आहेत. ऍड वैशाली भुषण बडगुजर यांनी महिलांचे हक्कासंदर्भात वेळोवेळी लढा देवून महिलांना पोटगी, चाइल्ड कस्टडि, महिलांचे कौटुंबीक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यांअंतर्गत अनेक महिलांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच दिवाणी तथा फौजदारी कायद्यांअंतर्गत अनेक महिलांना एक स्त्री म्हणून समाजात ताठ मानेने जगण्याचा मान मिळवून दिला आहे. ऍड वैशाली भुषण बडगुजर यांनी स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारा विरुध्द दिलेल्या लढ्याचा सन्मान करण्यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑ. बँक शाखा भोसरी पुणे याचेकडून त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी www.advbadgujar.com वर आपण भेट देऊ शकतात .

ऍड. वैशाली यांनी पुढील वाटचालीस badgujar.in वेबसाइट तर्फेमनःपूर्वक शुभेच्छा .

1 Comment

  1. एडवोकेट वैशाली भूषण बडगुजर यांनी 92 जोडप्यांचा समेट घडवून आणला या अतिशय उत्कृष्ट कार्य त्यांनी केलेले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन असा संसार जोडण्याचे काम त्यांनी यापुढे करावे ही सदिच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*