अमरावती येथील श्री. दिलीप धोंडू बडगुजर यांची आरोग्य सेवेतून यशस्वी सेवानिवृत्ती तसेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – सौ. स्वाती दिलीप बडगुजर, अमरावती

अगदी थोड्या कालावधीत आपल्या माणसांना ओढ लावणारं तुमचे व्यक्तिमत्त्व…..
अल्प काळात जन्मोजन्मीचं प्रेम देणारं….
घेणाऱ्यांची ओंजळ अपुरी पडावी असं, तुमचे व्यक्तमत्व….
मैत्री पण अशी की स्वार्थाचा लवलेशही नाही अस तुमचं व्यक्तिमत्त्व…..
अतिशय लोभस, समंजस,सुहास्य व कर्तव्य तत्पर, अस तुमचे व्यक्तिमत्त्व…
आयुष्य ही असं की, वाटावं जन्मोजन्मी ची साथ ही अशीच रहावी….
अशा उमद्या, खंबीर, समर्थ व्यक्तिमत्वाचा धनी माझा सखा, मित्र, मला पती म्हणून लाभला,
तुमच्या सोबतीने व सहजीवनाने माझे आयुष्य आनंदी व वैभवसंपन्न झाले. मी ईश्र्वराचे त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करते.

कोरोना काळात जीवन-मरणाच्या झुंजीत तुम्ही विजयी झालात….
33 दिवस ICU मध्ये,3 वेळा व्हेंटिलेटरवर, या 33 दिवसात 6By4 चा कॉट हेच आयुष्य,सोबत फक्त नर्सेस व डॉक्टर व झुंज प्रत्येक्ष कोविड नावाच्या राक्षसासोबत….
कोरोना काळातील या लढाईत तुम्ही विजयी झालात…
मृत्यूच्या दाढेतून स्वतःला सहीसलामत घेऊन येणे व त्यानंतर फास्ट रिकव्हरी करीत पुन्हा आपल्या वैद्यकीय पेशामध्ये रममान होणे सर्व काही थक्क करणार आहे….
इतकी हिम्मत, इतका धीर, प्रचंड वेदना सहन करण्याची ताकद, दुर्दम्य इच्छाशक्ती, इतका जिगर परमेश्वर सर्वांनाच देवो…
अस म्हणतात की, 2020 हे सर्वात घातक होत, पण मी असं म्हणेल की मी आयुष्यात सर्वात जास्त मिळकत 2020 मध्ये मिळवली….
कारण 2020 मध्ये मला तुम्ही परत मिळाले, आई श्री. चांमुड़ा मातेने पुन्हा एकदा माझी ओटी भरली व मला सवास्न बनवलं…..
आज तुमचा वाढदिवस व 33 वर्ष प्रदिर्घ शासकीय वैदकीय सेवेतील सेवा निवृत्ती दिवस
हा वाढदिवस व ही निवृत्ती सर्वार्थाने चिरायू होवो.
चामुंडा देवी आपल्या सर्व इछ्या आकांशा पूर्ण करोत,तुम्हास आरोग्यपूर्ण दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
???????

डॉ. दिलीप धोंडू बडगुजर हे जेष्ठ समाजसेवक आहेत. तसेच सामाजिक कार्यात हिररीने सहभाग नोंदवित असतात. बडगुजर. इन टिमचे हितचिंतक आहेत. त्यांना यशस्वी सेवापुर्तीच्या आणि वाढदिवसाच्या बडगुजर. इन टिम, युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांचेकडून हार्दिक शुभेच्छा व भावी आयुष्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा.

2 Comments

  1. जय बडगुजर सेना!
    जय बडगुजर सेना!
    समिती, प्राऊड गृपचे उत्तम समाजकल्याण कार्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*