?अभिनंदन अभिनंदन?
यावल,साकळी ह.मु. वसई येथील श्री. दिपक मधुकर बडगुजर यांना लायन क्लब सॅटेलाइट सर्विस वीक अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. हे कै.मधुकर कृपाराम बडगुजर व ग.भा.विमल मधुकर बडगुजर यांचे सुपत्र आहे.
श्री.दीपक बडगुजर हे ZEE TV मराठी वाहिनी येथे मागील 20 ते 22 वर्ष पासुन सर्व्हिस करत होते.यांचे शिक्षण बी.कॉम, डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स पर्यंत झाले आहे.व त्यांची पत्नी सौ.रेखा दिपक बडगुजर हे LIC मध्ये उच्च पदावर कार्यरत असुन त्यांचे चिरंजीव प्रज्वल हा इंजिनिरिंगच्या तिसऱ्या वर्षात सेंट फ्रान्सिस काँलेज,बोरिवली येथे शिकत आहे.
१ जुलै २०२० रोजी लायन्स क्लबचे प्रेसिडेंट म्हणून श्री.दिपक बडगुजर यांना नियुक्त करण्यात आले.
लायन्स क्लब या संस्थे अंतर्गत बरीच सामाजिक कार्यक्रम राबविले जातात, आता मागील कोरोना काळात सम्पूर्ण जग हे लॉक डाउन होते त्यावेळेस लायन्स क्लबचे डिस्ट्रक गव्हर्नर लायन शशिकांत मुद यांच्या नेत्रुत्वाखाली या संस्थे मार्फत १३ लाख रूपयांचे औषधी हे वसई कोव्हिड सेंटरला दिले ज्या मुळे अनेक लोकांचे प्राण वाचले. तसेच ऑनलाइन शाळा सुरु झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थीनीना लायन्स क्लब तर्फे ३६,०००/- रूपयांचे ६ मोबाइल चे ही मोफत वाटप करण्यात आले.नविन वर्षाच्या सुरवातीलाच लायन्स क्लब तर्फे वसई येथील डि.एम.पेटीट या सरकारी हाँस्पिटल मध्ये सात लाख रूपयांच्या औषधांचे वाटप डिस्ट्रक गव्हर्नर व लायन्स टीम यांच्या तर्फे करण्यात आले,तसेच गरजवंताना ब्लँकेट, किराणा किट, चादर, सायकल, ट्रायसिकल,व्हिल चेअर पोलिसांसाठी बँरीकेडस असे साधारण तिन ते सव्वातीन लाख रूपयांचे उपक्रम हे राबविले गेले.
श्री.दिपक हे अखिल भारतीय बडगुजर समाजाचे माजी पदाधिकारी आहेत.त्यांनी व मदन बडगुजर आणि टीमच्या सहकार्याने badgujar.com या वेबसाईटचे नंदुरबार येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचे मा.अध्यक्ष श्री.सुरेश मगन बडगुजर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते.
श्री.दिपक हे मागील पाच ते सहा वर्षा पासून Website Design चा बिझनेस करत आहेत.
आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज,अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड गृप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला गृप ? जय चामुंडा माता हिरकणी ? यांच्या कडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ??

श्री.दिपक मधुकर बडगुजर यांना लाॅयन क्लब सॅटेलाइट सर्व्हिस वीक अवॉर्ड





दिपक मधुकर बडगुजर यांना लॉयन सॅटॅलाइट अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन बडगुजर समाजाचा मानाचा तुरा त्यांनी लायन्स क्लब मध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवून रोवला आहे पुनश्च त्यांचे खूप खूप अभिनंदन