# बडगुजर “रेशीमबंध” वधूवर परिचय सूची २०२१ प्रकाशन सोहळा
अमळनेर दि. २५ डिसेंबर २०२० रोजी रेशीमबंध वधु वर परिचय सूची २०२१ पुस्तिकेचे प्रकाशन बडगुजर मंगल कार्यालय, शिरूड नाका अमळनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अतीशय सुंदर वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास श्री. सुरेशशेठ महाले, उद्योजक भुसावळ यांचे शुभहस्ते प्रकाशन पार पडले तसेचया. अ.भा. बडगुजर महासमितीचे अध्यक्ष श्री. माधवराव शेठ बडगुजर हे अध्यक्ष स्थानी होते. मान्यवरांमध्ये अ.भा.ब.म. समितीचे माजी अध्यक्ष श्री. आंनदाभाऊ सुर्यवंशी, सचिव श्री. राजेंद्रशेठ बडगुजर, शिक्षण समिती प्रमुख श्री. पी. डी. बडगुजर सर, जळगांव चे बडगुजर समाज अध्यक्ष श्री. लिलाधरभाऊ, बडगुजर समाजदूत चे संपादक प्रा. ईश्वर बडगुजर, जळगांव बडगुजर समाज सदस्य श्री. विकासशेठ, शिरपूरचे श्री. धर्मेंद्र पोपटशेठ बडगुजर, बदलापूर येथील श्री. दिलीपशेठ, बोराडीहुन श्रीमती सुनंदा ताई, फागणे हुन श्री. अमित बडगुजर तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

रेशीमबंध परिवाराचे प्रमुख श्री. बापु पहेलवान यांनी मान्यवरांचे स्वागत तसेच आभार व्यक्त केले. श्री. किरण बडगुजर सर, श्री. सुरेश बडगुजर सर यांनी डेस्कवरून सुंदर समायोजन केले. रेशीमबंध पुस्तिकेचे प्रकाशन श्री. कन्हैयालाल शेठ व संपादक श्री. रविंद्र शेठ यांचे व त्यांच्या पूर्ण टीमचे मान्यवरांनी भर भरून कौतुक करून त्यांचे हार्दिक आभार मानले असा सुंदर उपक्रम व कार्यक्रम अमळनेर वासीयांचा वारसा आहे, असे गौरवउदगार कडुन त्यांचा कामाचे कौतुक केले. मान्यवरांनी समाजात दिवंगत झालेले जेष्ठ – श्रेष्ठतींना आदरांंजली वाहिली. तसेच मान्यवरांचे भाषण होऊन समाजासाठी बहुमोलाच्या सूचना मांडण्यात आल्या, मंडळा तर्फे उपस्थित पाहुण्यांना चहा, नास्ता देऊन श्री. बापूशेठ यांनी बडगुजर प्राऊड ग्रुप चे कार्यकर्ते श्री. लोकेश रविंद्र कोतवाल व श्री. विजय बडगुजर यांनी ऑनलाईन युट्युब च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षपण करून सर्व समाजाला कार्यक्रम दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानुन त्यांचे कौतुक केले व कार्यक्रमाची सांगता केली.
हा ऑनलाईन कार्यक्रम बडगुजर समाज बांधव व बघिनीची संख्या 1600 पेक्षा जास्त लोकांनी हा कार्यक्रम बडगुजर. इन या वेबसाईटवर लाईव्ह पाहिला…
सदर कार्यक्रमास मुंबई येथील धडाडीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. मोहन हिरालाल बडगुजर, अध्यक्ष – अ. भा. ब. समाज कल्याण समिती यांनी आपले मनोगत ऑनलाईन व्यक्त केले आणि कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
बडगुजर प्राऊड ग्रुप आणि अ. भा. ब. स. युवक समिती यांचे तर्फे अत्यंत नियोजन बध्द व कोरोना च्या नियमांचे पालन करीत यशस्वी रित्या कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व अमळनेर समाज मंडळ व रेशीम बंध वधूवर समिती सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.


Leave a Reply