अमळनेर येथील बस वाहकाचा प्रामाणिक पणा – श्री.योगेश बडगुजर सर पिंप्री खुर्द ता.धरणगांव, जि.जळगांव

बस कंडक्टर (वाहकाचा) प्रामाणिकपणा

मुकटी,ह.मु.अंमळनेर येथील : श्री.उत्तम
नथ्थू बडगुजर व श्रीमती. मानुबाई उत्तम बडगुजर यांचे सुपुत्र श्री.हंसराज उत्तम बडगुजर यांचा अंमळनेर एस.टी डेपो अंमळनेर, बडगुजर समाज व इतर मित्र मंडळी यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले असून व त्यांना दोन मुले आहेत असा त्यांचा परिवार आहे. ते अंमळनेर डेपोत १० वर्षा पासून एस.टी.महामंडमळात
कंडक्टर (वाहक) म्हणून कार्यरत आहेत. दिनांक ११/१२/२०२० वार शुक्रवार रोजी अंमळनेर डेपोची गाडी ही पुणे ते अंमळनेर साठी निघाली असता त्यांत प्रवासी सौ. शोभाबाई पाटील व त्यांचा मुलगा रविंद्र पाटील हे अंमळनेर येथे घाईगडबडीत आपली बॅग त्या बस मध्ये विसरून ड्रीम सीटी आपल्या घरी निघून गेले व नंतर वाहक श्री.हंसराज बडगुजर यांच्या लक्षात आले की बस मध्ये कोणी तरी बॅग विसरले आहे मग त्यांनी ती बॅग आपल्या वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे सुपूर्द केली व ते पुढील फेरी साठी निघून गेले. नंतर त्या प्रवाश्यांच्या लक्षात आले की,आपली बॅग ही बस मध्येच विसरलो व त्यांनी बस डेपोत विचारणा केली असता
वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांची सर्व शाहनिशा करून त्यांची बॅग त्यांना परत देण्यात आली.
अंमळनेर बस डेपो – 258 – 7232019
अंमळनेर कंट्रोलर श्री.पाटील 9766170873
श्री.हंसराज उत्तम बडगुजर 8390455445

या प्रमाणिकते बद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स.युवक समिती, बडगुजर प्राउड गृप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला गृप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडून
श्री.हंसराज उत्तम बडगुजर 8390455445 यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ??

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*