सलग 25 वर्षानंतर मिळाला बडगुजर समाजाला उपसरपंच पदाच्या बहुमान… सौ. उषाबाई दयाराम बडगुजर यांची अर्थे खु. उपसरपंचपदी अभिनंदनीय निवड – श्री. चंद्रकांत बडगुजर, बोराडी


अर्थे- शिरपूर तालुक्यातील अर्थे खु येथील श्री दयाराम एकनाथ बडगुजर यांच्या पत्नी तसेच श्री योगेश बडगुजर व चि. सुदाम (सोनू) बडगुजर, संचालक ओम साईराम डिजिटल फोटो स्टुडिओ अर्थे यांच्या मातोश्री सौ उषाबाई दयाराम बडगुजर यांची आज दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी अर्थे खु ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अभिनंदनीय सर्वानुमते निवड करण्यात आली.


आज दुपारी अर्थे खु च्या सरपंच सौ. दिपाली अनिल गुजर यांच्या उपस्थितीत सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेत उपसरपंचपदी सौ उषाबाई दयाराम बडगुजर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अर्थे बु व खु या दोनही गावात बडगुजर समाज हा अल्पसंख्याक आहे अर्थे बु या गावात जवळपास 45/50 कुटुंबांचे वास्तव्य आहे यात 2 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते तर खु या गावात 25/30 कुटुंबांचे वास्तव्य येथे 1 ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेत दोन्ही गाव मिळून पहिल्यांदाच 3 ग्रामपंचायत सदस्य निवडण्याची किमया बडगुजर समाजाच्या एकतेमुळे झाली होती. बडगुजर समाज सामाजिक व राजकीयदृष्ट्या एक संघ गावात असल्यामुळेच शक्य झाले तसेच अर्थे खु गावात पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत बडगुजर समाजाचे नेतृत्व सौ बडगुजर हे करीत आहेत या अभिनंदनीय निवड बद्दल गावातील समाज बांधव व गावातील हितचिंतक यांनी आनंद व्यक्त केला. सौ उषाबाई बडगुजर यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.
सौ उषाबाई दयाराम गुजर यांना अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तसेच जय बडगुजर सेना तर्फे हार्दिक अभिनंदन.

1 Comment

  1. अभिनंदन अर्थे खु ग्रामपंचायत स्थापनेला २५ वर्ष झाल्यानंतर समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले स्तुत्य निवड

Leave a Reply

Your email address will not be published.


*