अभिनंदन !! अभिनंदन !! अभिनंदन !!
बडगुजर समाज बांधव यांनी बडगुजर समाजाचे नांव हे जळगांव मार्केट मध्ये रोवला मानाचा तुर्रा – जळगांव येथील समाज बांधव श्री.विकास पुंडलिक बडगुजर हे साधारण ३०-३५ वर्षा पासुन जळगांव मार्केटमध्ये फूटपाथवर रेडिमेट कपडे व बेल्ट विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. हळूहळू प्रगति करत, कष्ठाचे फळ हे आज जळगांव जिल्ह्यात वटवृक्षात रूपांतर होऊन त्यांनी त्यांच्या स्वत:च्या मालकीचे भव्य शोरूमचे सोमवार दि.१६/११/२०२० रोजी जळगांव नगरीत शुभारंभ केला.
या शुभारंभ प्रसंगी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात अखिल भारतीय बडगुजर समाजाचे सचिव श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर, मुकटी येथील पत्रकार श्री. ईश्वर सर, धुळे येथील समाज बांधव श्री.अशोक शेठ व भुसावळ येथील बडगुजर समाजाचे अध्यक्ष श्री. सुरेश महाले, श्री.नंदलाल पवार,श्री.निलेश बडगुजर,श्री.संजय बडगुजर, जळगांव येथील बडगुजर समाजाचे अध्यक्ष श्री.लीलाधर दत्तात्रय बडगुजर, सचिव श्री.गोविंद पुंडलिक बडगुजर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. भिला गिरधर बडगुजर, श्री प्रकाश बडगुजर, श्री.राजेंद्र दत्तात्रय पवार, व श्री परशुराम बडगुजर असे अनेक समाज बांधव श्री.विकास बडगुजर यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय बहुजन समाजाचे सचिव श्री राजेंद्र सर यांनी फित कापून दुकानाचे उद्घाटन केले व श्री.विकास शेठ यांनी केलेल्या प्रगतीचे कौतुक केले व विकास भाऊ नी नावा प्रमाणे समाजात तसेच व्यवसायात प्रेरणा दायक काम केले त्यांचा यशात त्यांची धर्मपत्नी यांचा मोलाचा वाटा आहेच, सुना व मुले श्री.अजय, श्री.विजय यांनी ही खूप मेहनत करत व्यवसाय वाढवला मेहनत, चिकाटी, जिद्द ,आणि आलेल्या पैशाचे योग्य असे नियोजन केले व व्यवसाय करीत असतांना त्यांना बरेच अडचणी आल्या त्या दुकाना करीता त्यांना अथक प्रयत्न करावे लागले यासाठी कोर्टातही जावे लागले मोठी लढाई लढावी लागली व त्यांचे फळ त्यांना मिळाले पण त्यांचा हेतु प्रामाणिक व मुलभूत अधिकार असल्याने त्यांची बाजू सत्याची होती, न्यायाधिशांना त्यांचा बाजूने निकाल द्यावा लागला अश्या तऱ्हेने विजय झाला.
॥सत्यमेव जय॥।
आता पर्यंत महापालिकाचा हद्दीत स्वत:मालकीच्या दुकानात व्यवसाय चालू केला. आता स्वत:चा मालकीचा दुकानात व्यवसाय असल्याने भुषण आहे.व्यवसाय दालन भरभराटीचे होवो हीच शुभेच्छा ? आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड गृप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला गृप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! ??




Leave a Reply