सौ.सरिता रघुवंशी मुख्याध्यापिका सेवानिवृत्ती निमित्त त्यांनी आदिवासी महिलांना साडी आणि फराळाचे वाटप – श्री.योगेश बडगुजर (सर) प्रिंपी

अभिनंदन! अभिनंदन!अभिनंदन!
कढोली,ह.मु.एरंडोल येथील: श्री.मधुकर निंबा रघुवंशी (बडगुजर) यांच्या धर्मपत्नी सौ.सरीता मधुकर रघुवंशी मुख्याध्यापिका सेवानिवृत्ती निमित्त त्यांनी आदिवासी महिलांना साडी आणि फराळाचे वाटप केले,


एरंडोल – येथील रहिवाशी सौ. सरीता मधुकर रघुवंशी ह्या नुकत्याच जि.प. प्राथमिक शाळा वराड बु।।.ता.धरणगांव या शाळेतून सेवानिवृत्त झाल्या.त्यांनी आपल्या सेवाकाळातील तब्बल २२ वर्षे मराठखेडा – तुरा टखेडा या गांवात सेवा दिली.एक सामाजिक ऋण म्हणून दोन्ही गांवातील १०१ आदिवासी महिलांना साडी आणि दिवाळीचा फराळ वाटप केला. प्रसंगी मराठाखेडा सरपंच सौ.रत्नाबाई विठ्ठल पाटील, माजी सरपंच बाबुलाल पाटील, रघुनाथभाऊ ठाकरे, कृष्णा पाटील मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय आचलगांव, संजय मराठे, सुभाष मराठे, गोविंदा पाटील, सुरेश बडगुजर, मधुकर रघुवंशी, दीपेश आणि दीपाली रघुवंशी, प्रल्हाद पाटील, वसंत पाटील उपस्थित होते.

दिवाळी मनात असते
आकाशदिवे,
पणत्या, रांगोळ्या
पक्वान्ने, सजावट इ. सगळी
आनंदाची बाह्यरुपं.
एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या भावनांची
ती केवळ प्रतिकं असतात.
खरी दिवाळी असते मनामनात…आपल्या,
एकमेकांबद्दल वाटणारा स्नेह प्रेम, माया, वासल्य आपलेपणा
हीच खरी दिवाळी मनामनांची…!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

सौ. सरीता मधुकर रघुवंशी यांचे माहेर
ता.पाचोरा,लाजगांव येथील असून कै. सांडू सदाशिव पवार यांची कन्या, व सासर हे खेडी कढोली श्री.मधुकर निंबा बडगुजर यांच्याशी त्यांचा विवाह सन १९८४ साली झाला. शिक्षक असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांची बदली होत असे पण ज्या ठिकाणी ते रूजू झाले तेथे त्यांनी आपल्या जवळ असलेले ज्ञान हे दिले व शिक्षणाचा प्रसार केला.आपली कौटूंबिक जबाबदारी सांभाळून मुलींचे शिक्षण हे अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसे होईल व प्रत्येक मुलींला शिक्षण कसे घेता येईल ह्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले त्यासाठी प्रबोधन,मार्गदर्शन,ज्ञानाचे मार्गदर्शन, सरकार कडून ज्या योजना असतील त्या मुलींच्या शिक्षणासाठी राबविणे व त्यांचे शिक्षणाकडे कसा कल वाढेल याकडे लक्ष दिले व मुलींचे पूर्ण शिक्षण हे झालेच पाहिजे या साठी सभा घेणे त्या सभाषण करून शिक्षणाची आवड निर्माण करून मुलींनी शिक्षण हे घेतले पाहिजे यासाठी नाट्यकला सादर करणे.त्यांच्या पाल्यांना बोलवून मुलींनी शिक्षण हे घेतले पाहिजे यांचे फायदे काय आहेत हे विचार मांडले.
शिक्षण क्षेत्रात नोकरी करत असतांना त्यांनी बरेच उपक्रम ही राबविले.सौ. सरीता मधुकर रघुवंशी ह्या सेवानिवृत्त झाल्या पण आपण त्यांचे कार्य हे आपल्या साठी व समाजा साठी एक प्रेरणादायी आहे.आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड गृप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला गृप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा ??

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*