श्री.मोहन बडगुजर महाराष्ट्राचा आवाज हे गायन स्पर्धेत विजयी- श्री. मदन बडगुजर पनवेल (मुंबई)

?? श्री. मोहन बडगुजर
महाराष्ट्राचा आवाज??
श्री. मोहन बडगुजर च्या आवाजाने महाराष्ट्र झाला मंत्रमुग्ध

शहर कराओके स्पर्धेत पटकावला दुसरा क्रमांक

लाॅकडाउनच्या काळात संपूर्ण शहर घरात बंदिस्त असतांना डोंबिवली येथील धुळेकर श्री. मोहन हिरालाल बडगुजर यांनी आपली गायन कला विकसित केली
त्याच वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून कराओके ही गायन स्पर्धा जाहीर झाली.
या स्पर्धेत आपल्या समाजातील तिघांनी सहभाग घेतला. व्यापारी उद्योजक गटात मोहनबट बडगुजर हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते.

20 ऑक्टोबर रोजी झालेल्या अंतिम स्पर्धेत त्यांनी दुसरा क्रमांक पटकावून आपल्या गायन कलेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

संपूर्ण महाराष्ट्रातून दहा गटात झालेल्या स्पर्धेत हजारो जणांनी सहभाग घेतला. त्यात मोहन बडगुजर यांनी बाजी मारली.

या यशात आपल्या कुटुंबीयांचा मोठा सहभाग लाभला त्याचबरोबर देशभरातील हितचिंतकांनी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले.

अंतिम स्पर्धेत यांनी गायलेले उलझन चित्रपटातील गाणे लक्षणीय ठरले.

वयाच्या साठीतही कणखर आवाज आणि ठणठणीत आयुष्य मोहन बडगुजर यांना लाभले आहे.

या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज म्हणून यापुढे ते ओळखले जातील.

आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला ग्रुप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा ??

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*