अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित बडगुजर सेनेची – युवकांची अविस्मरणीय आणि यल्गार मिटींग ची आठवण
युवक जे बोलतात ते करतात पण याची प्रचिती देणारा कार्याचा संक्षिप्त आढावा.
१. वेब पोर्टल सुरू करणे – १.५ वर्षांपूर्वी च केले…समाजाला डिजीटल करण्यात महत्त्वाचे ठरत आहे. फक्त एका क्लिक समाजाची अद्ययावत माहिती जागतिक स्तरावर उपलब्ध.
२. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन – आत्तापर्यंत पर्यंत ३ दा प्रा. कोटवे सरांच्या मार्गदर्शन आयोजित केले व सराव पेपर पण घेतले.
३. समाजातील युवा वर्गाला रोजगार मिळविण्यासाठी मदत आतापर्यंत १५ पेक्षा जास्त युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली आणि अनेकांना माहिती पुरविण्यात आली, येत आहे यापुढेही पुरविण्यात येईल.
४. विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, वकिली क्षेत्रातील मार्गदर्शन, इंटरव्ह्यू स्किल्स् आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इ. शैक्षणिक विषयक मार्गदर्शन पर कार्यक्रमांचे आयोजन
५. लॉकडाऊनच्या काळात गरजू समाजबांधवांना मदत
६. समाजातील ३०० विद्यार्थ्यांना फ्री ऑनलाईन Computer Courses चे शिक्षण डिजीटल क्लास App श्री. हितेशभाई मोहकर यांच्या सहकार्याने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले.
७. समाजात विविध नवनवीन उपक्रम राबवून समाजातील युवासंघटन मजबूत करणे. एक नविन प्रेरणा आणि संघटनाचे महत्त्व पटवून देणे. बऱ्याचशा संस्था आणि संघटनांसोबत एकत्रित रित्या कार्यक्रम आयोजन आणि समन्वय साधून कार्य करणे याचे एक आदर्श उदाहरण टिम तर्फे समाजात सादर केले.
अजूनही काही उपक्रम आमच्या टिमतर्फे राबविण्यात येत आहेत. बडगुजर समाजातील पहिला व्यवसाय मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजन सुरू आहे. लवकर याचे नियोजन करून सर्वांना कळविण्यात येईल.
अशा विविध उपक्रमातून बडगुजर समाजात युवकांना जोडून संघटन कसे मजबूत करता येते हे युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व समस्त वेब पोर्टल टिम ने दाखवून दिले…
?जय बडगुजर सेना?

Leave a Reply