नंदुरबार- बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे कोरोना काळातदेखील विद्यार्थी व महिलांसाठी ऑनलाईन स्पर्धेसारखे उपक्रम राबवून प्रोत्साहीत करणे हे कौतुकास्पद आहे. विविध स्पर्धेच्या माध्यमातून समाजातील मुलांना व्यासपीठ उपलब्ध होत असते. यामुळे त्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर यांनी केले. ते येथील बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे आयोजित बक्षिस वितरण समारंभात बोलत होते.
बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे नुकतीच ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली. या निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ काल दि.४ ऑक्टोबर रोजी येथील जगताप लॉन्स येथे एका छोटेखानी कार्यक्रम घेवून पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिका पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, नगरसेवक रविंद्र पवार, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नितीन जगताप, नगरसेवक दिलीप बडगुजर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात आई चामुंडा मातेच्या प्रतिमा पुजनाने झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षिस देवून गौरविण्यात आले. यावेळी नितीन जगताप म्हणाले की, बडगुजर समाज संख्येने छोटा असला तरी ते दरवर्षी विविध उपक्रम राबवितात, हे इतर समाजासाठी शिकण्यासारखे आहे. बडगुजर समाजास कुठलीही मदत लागल्यास मी त्यांच्यासाठी तत्पर आहे. तसेच कैलास पाटील व रविंद्र पवार यांनीही आपल्या मनोगनातून विजयी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. शेवटी दिलीप बडगुजर यांनी थोडक्यात बडगुजर उन्नती मंडळाविषयी माहिती सांगितली. तसेच विजयी स्पर्धक मयुर बडगुजर यानेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रेरणादायक उदाहरण देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे ज्येेष्ठ सल्लागार भाईदास बडगुजर, पंडीत बडगुजर, उपाध्यक्ष रविंद्र बडगुजर, सचिव अश्विन बडगुजर, सहसचिव दिनेश बडगुजर, खजिनदार देविदास बडगुजर, प्रसिद्धीप्रमुख संदीप बडगुजर, विजयकुमार बडगुजर, गणेश बडगुजर, प्रकाश बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.


Leave a Reply