नाशिकमधील सिडको परीसरातील जनतेच्या सेवेस परिसरातील काही डॉक्टर्सने पुढाकार घेऊन कोविड रुग्णांच्या उपचारासाठी विघ्नहर्ता हॉस्पिटल या नवीन हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्रिमूर्ती चौक सिडको येथील दिव्या ऍड लॅब्स संकुलात स्थित या हॉस्पिटलमध्ये 45 बेड्स ची व्यवस्था करण्यात आलेली असून त्यापैकी 12 ICU बेड्स आहेत, तसेच 30 बेड्स ला ऑक्सिजन ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. व्हेंटिलेटर, बायपाप मशीन, मॉनिटर्स, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टिम, एक्स रे, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स … ई सुविधांनी युक्त अशा सुसज्ज हॉस्पिटलला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देत उपस्थिती नोंदवली.

स्थानिक नगरसेवक मा. सुधाकरजी बडगुजर, मा. भाजप प्रदेशाध्यक्ष मा. लक्ष्मणजी सावजी, सकाळचे संपादक श्री. राहुल रणाळकर, तनिष्का समन्वयक श्री. विजयकुमार इंगळे, यांसाहिय अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. संजय धुर्जड, डॉ. चंचल साबळे, डॉ. चंद्रशेखर जाधव, डॉ. शिवानी पांडे, डॉ. सतीश अहिरे, डॉ. सुमित शिंपी, डॉ. जितेंद्र गांगुर्डे, श्री. अविनाश शिंदे, सौ. धुर्जड हे उपस्थित होते.

स्थानिक नगरसेवक मा. सुधाकरजी बडगुजर, मा. भाजप प्रदेशाध्यक्ष मा. लक्ष्मणजी सावजी, सकाळचे संपादक श्री. राहुल रणाळकर, तनिष्का समन्वयक श्री. विजयकुमार इंगळे, यांसाहिय अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply