चोपड्याचे चि. अभिषेक बडगुजर यांची चंद्रपूर येथे रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून नियुक्ती..! – श्री. दिपक भिका बडगुजर, नाशिक

चोपडा: येथील चि. अभिषेक रविंद्र बडगुजर यांची महाराष्ट्र शासनाच्या विभागीय वन कार्यालय,मर्कांडा,चंद्रपूर येथे “रेंज फॉरेस्ट ऑफिसर” (RFO रेंजर) पदी अभिनंदनीय नियुक्ती झाली.
      महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीतही ते यशस्वी झालेने, त्यांची आर.एफ.ओ.(रेंजर) या पदावर सन्माननीय निवड झाली.

चि. अभिषेक बडगुजर हे लहानपणापासूनच अभ्यासू आहेत. दहावीच्या परीक्षेत चोपडा प्रताप विद्या मंदिर शाळेतून प्रथम क्रमांकाने तर चोपडा तालुक्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तसेच बारावी परीक्षेत पुणे येथून ८४ टक्के गुण मिळवून विशेष गुणवत्तेत यश संपादन केले. पुण्यातच सी.ओ.ई.पी. महाविद्यालयातून बी.टेक. ची पदवी ६.३ जी.पी.ए. प्राप्त केली.

          त्यानंतर दिल्लीत राहून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाच्या डेप्युटी कलेक्टर व तहसीलदार श्रेणीतील काही लेखी परीक्षांमध्ये यश प्राप्त केले. एम.पी.एस.सी. ची परीक्षा २०१८- १९ तसेच २०१९- २० मधे मुलाखती पर्यंत पोहचून त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर पर्यावरण वन जल-वायू परिवर्तन मंत्रालय अंतर्गत केंद्रीय अकादमी वन शिक्षा विभाग, संत मेरीज हिल्स, खरसाड, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल मध्ये प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.

चि. अभिषेक बडगुजर हे चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते व विवेकानंद ऑफसेट प्रिंटींग प्रेसचे रविंद्र पंडित बडगुजर यांचे चिरंजीव आहेत.

     चि. अभिषेकच्या या यशाबद्दल चोपडा येथील बडगुजर समाज बांधव व नातेवाईक मित्र परिवारातर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…!

त्यांची नियुक्ती ही काही महिन्यांपूर्वी झालेली आहे. त्यांचा हा शैक्षणिक यशाचा प्रवास हा अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. ते आज प्रशासकीय अधिकारी म्हणून रूजू झाले आहेत तरी सुद्धा त्यांची यु. पी. एस. सी. साठी तयारी सुरू आहे. आणि भविष्यात नक्कीच ते आपल्या आई वडिलांचे आणि समाजाचे नांव देशपातळीवर लौकिक करतील. त्यासाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा.

चि. अभिषेक यांचे अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राउड टीम तथा बडगुजर वेब पोर्टल टीम तर्फे हार्दिक अभिनंदन व भावी भरीव कामगिरीस शुभेच्छा.

श्री.अभिषेक बडगुजर

6 Comments

  1. Congratulation Abhishek and hope you will cooperate and help other students upliftment.Best wishes for further journey

  2. अभिषेक रविंद्र बडगुजर याचे यश खरोखर वाखाणण्याजोगे आहे दीड-दोन वर्षांपूर्वी त्याने प्राप्त केलेले हे यश समाजाच्या समोर आत्ता आलेले आहे तरी त्याची योग्य ती दखल घेऊन त्यांचा उचित सत्कार करणे गरजेचे आहे

  3. पारोळा येथील कोविड सेंटर उभारून आप्पा उर्फ उमेश करोडपती यांनी समाजामध्ये एक मानाचा तुरा रोवला आहे त्यांच्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा

  4. अभिषेक बडगुजर यांचे प्रशासकीय अधिकारी पदाच्या शासनाच्या सेवेत दाखल झाल्या बद्दल खुप आनद झाला, त्याचे यश कौतुकास्पद आहे, या यशामुळे, परिवाराची, बडगुजर सामाजाची मान नक्कीच उंचावलेली आहे,
    अभिषेक चे त्याच्या आई – वडीलांचे मनापासून हार्दीक अभिनंदन

    अशिच दिवसेंदीवस अभिषेक ची प्रगती होवून किर्ती व यश प्राप्त होण्यासाठी हार्दीक शुभेच्छा

Leave a Reply to Milind Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*