मुळगांव साकळी ता. यावल ह. मु. नाशिक नगरीतील श्री.रघुनाथ पंडीत बडगुजरव सौ. सरला रघुनाथ बडगुजर यांची सून व श्री. हर्षल रघुनाथ बडगुजर यांच्या अर्धांगिनी डॉ.सौ.रूपाली हर्षल बडगुजर यांना आज एम.डी. मेडीसीन (होमिओपॅथी) मध्ये आज दि. ३ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकलात पदवी प्राप्त झालेली आहे. डॉ. रूपाली यांनी अतिशय कठीण परिस्थितीत आपले एमडी चे शिक्षण पूर्ण केले.

डॉ. रूपाली यांनी आपले बी. एच. एम. एस. नाशिक मधील नामांकित होमिओपॅथी कॉलेज मोतीवाला येथून पुर्ण केले. तद नंतर उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे खारघर येथील वाय. एम. होमिओपॅथी मेडिकल कॉलेज नवी मुंबई येथे पुढील वैद्यकीय शिक्षण घेतले.
डॉ. रूपाली यांना त्यांचे पती श्री. हर्षल बडगुजर, आपल्या मुलीप्रमाणे बाळगणाऱ्या सासू सौ. सरल बडगुजर व सासरे श्री. रघुनाथ बडगुजर तसेच सौ. रूपाली यांचे आई-वडील यांनी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली. तसेच नाशिक येथील समृद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ.कमलेश बडगुजर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
डॉ. रुपाली हर्षल बडगुजर यांना एम. डी मेडीसीन (होमिओपॅथी) ही पदवी मिळाल्य बद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे
हार्दिक शुभेच्छा.


Leave a Reply