श्री.राजेंद्र भालचंद्र बडगुजर कुसुंबा,धुळे
अखंड समाज सेवेचा ध्यास घेतल्याने… दररोज काहीना काही कारणास्तव मला बाहेर जावे लागतं कधी अंत्यविधी,सुख-दुःख बरोबरच – आजारी पेशंटला दवाखान्यात नेणे ,फिजिओ थेरेपी ,सिटीस्कॅन,सोनोग्राफी इत्यादी कोणत्या ना कोणत्या… कोणालाना कोणाला घेऊन मी दवाखान्यात जात होतो.कधी धुळे तर कधी नाशिक येथेकोरोनाची प्रचंड लागन सुरू असून देखील जीव धोक्यात घालून रिस्क घेण्याचे आव्हान स्वीकारले 5 सप्टेंबर रोजी सोनोग्राफी सेंटर वरून एका पेशंटला मी घरी सोडले तदनंतर मला संध्याकाळी थोडी कुन्-कुन् वाटायला लागलं. मी एक पॅरासिटामॉल व एक सायनस सेवन अशा दोन गोळ्या घेऊन रात्री झोपी गेलो.सहा सप्टेंबरला आंघोळ केल्यावर मला जास्त त्रास जाणवू लागला.मला जाणीव व्हायला लागली आता आपण कोरोनाच्या चपेट मध्ये आलो आहोत. लगेच मी धुळे येथील *”आयुष हॉस्पिटल” डॉ. तुषार चव्हाण एमडी मेडिसिन* यांना फोन केला.रविवार सकाळी असूनही त्यांनी माझा फोन रिसीव्ह केला. मी त्यांना आपबिती सांगितली त्यांनी मला तीन वाजता ताबडतोब दवाखान्यात बोलावून घेतले.अंगात ताप होता त्यांनी तपासणी करून मला ट्रीटमेंट दिली व उद्या दिनांक सात सप्टेंबर रोजी HRCT करून शासकीय रुग्णालयात घेऊन यायला सांगितले.मी सहा तारखेला संध्याकाळी घरी गेलो मला रात्री प्रचंड ताप भरला होता.जोरात थंडीही वाजून आली व अंगावर दुखू लागले,खोकलाही वाढला होता.कोरोनाने आता मला विळखा घातल्याचे जाणवले होते.
मी घरात विलीनीकरण स्वतःहून करून घेतले रात्रभर झोप लागलीच नाही सात तारखेला मी उठलो ब्रश वगैरे प्रात:विधी उरकून सकाळी आठ वाजताच घर सोडले.घर सोडताना पूर्ण घर सानिटायझर केले एक चटई,ऊशी व पांघरून गाडीत ठेवून HRCT साठी नंबर लावला.10 वाजता शासकीय दवाखान्यात जाऊन स्वाप दिला. 10:30 वाजता HRCT काढला. प्रचंड त्रास होत असतानाही या सगळ्या गोष्टी एकट्यानेच केल्या एच आर सिटी चा रिपोर्ट दीड वाजता मिळाला तो घेऊन मी मी परत डॉ. तुषार चव्हाण यांच्याकडे गेलो.रिपोर्ट मध्ये फारसे काही निघाले नाही. डॉक्टरांनी मला विलगीकरण करण्याचा सल्ला दिला.तसा मी तयारीतच होतो कारण माझ्या समाजसेवेचा त्रास घरच्या म्हाताऱ्या आई-वडिलांना होऊ नये पत्नी व मुलांना होऊ नये म्हणून मी माझ्या धुळे येथील घरीच बिस्तार मांडले.
आता परीक्षा होती दिलेल्या स्वापच्या रिपोर्टची… रिपोर्ट नऊ तारखेला रात्री नऊ वाजता येणार होता.सात-आठ व नऊ या तीन दिवसात मला थंडी,ताप,खोकला व अंगदुखी यांनी बेजार करून टाकले होते.तीन दिवस जेवणाचा डबा कुसुंबा येथून मुलगा महेश पोहोचवत होता.जेवणाची चव गेलेली होती… भूक अजिबात लागत नव्हती…जेवणावरची इच्छाच संपली होती.दिनांक 9 तारखेला बरोबर नऊ वाजता दिलेल्या स्वापचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा फोन दवाखान्यातून आला ते अपेक्षितच होते आता करायचे काय ? ट्रीटमेंट सुरू होती.मी रात्री 9:30 वाजता डॉक्टर तुषार चव्हाण यांना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे बातमी कळवली. डॉक्टरांनी दहा तारखेला तीन वाजता दवाखान्यात बोलवले मी स्वतःशीच विचार करत होतो मी पॉझिटिव आहे आणि तरी डॉक्टर मला दवाखान्यात बोलवतात… काय कारण असू शकते ? त्या रात्रभर मला झोप आली नाही. माझ्या घरच्यांचे काय ?आई-वडील म्हातारे आहेत त्याचं काय ? त्यातच आईला बीपीचा तर वडिलांना शुगरचा त्रास यांना जर लागण झाली तर ? एक ना अनेक प्रश्न मनात घोळत होते. घरून सारखे फोन येत होते रिपोर्टचे काय झाले म्हणून मी त्यांना म्हटले रिपोर्ट आल्यावर मी तुम्हाला कळवेन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी मी दहा तारखेला सकाळी सात वाजता मी घरी पत्नीला कळवली. त्यानंतर त्यांनी प्रचंड धास्तीच खाल्ली मी त्यांना म्हटलं घाबरू नका सर्वजण दहा वाजता शासकीय दवाखान्यात स्वापची टेस्ट देण्यासाठी या.दहा वाजता सर्वांचा स्वाप दिला.मी त्यांना कुसुंबा येथे पाठवून दिले.दहा तारखेचा तीन वाजता डॉक्टर तुषार चव्हाण यांच्याकडे गेलो. त्यांनी माझ्या मनातील भीती घालवली. गोळ्या बदलून दिल्या चार दिवसापासून पोटात अन्न नव्हते प्रचंड अशक्तपणा आलेला होता आता परीक्षा होती घरच्यांनी दिलेल्या स्वापच्या रिपोर्टची… त्यांचा रिपोर्ट 12 तारखेला रात्री 9:30 वाजता आला त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले मात्र मुलगा महेशचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने माझ्या जमिनीखालची वाळूच सरकली. दिनांक 7 ते 12 तारखेपर्यंत या सहा दिवसात डोळ्याला डोळा लागला नव्हता. अन्न पोटात नसल्याने कमालीचा अशक्तपणा आला होता.घरचे प्रमुख लोकच पॉझिटिव्ह असल्याने प्रचंड ताण मनावर होता. परंतु मन खंबीर केले आपल्याला व मुलाला काहीही होणार नाही. *”आई श्री चामुंडा माता व श्री स्वामी समर्थाचे आशीर्वाद”* पाठीशी आहेत. आयुष्यभर समाजसेवा करून सर्वांचे कल्याण होईल असेच काम केले आहे.आयुष्यात कोणाचे वाईट आपण केले नाही. तर कोरोना पासून निश्चित आपलीच सुटका होईल. अनेकांना संसाराला लावले दोनाचे चार हात केले तेव्हा आपल्याला काहीच होणार नाही. म्हणतात ना *”देव तारी त्याला कोण मारी”* मन धिट केले मी पॉझिटिव्ह असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर व समाजात पसरली होती.एव्हाना अनेक समाज बांधवांचे फोन येत होते
मी निर्णय घेतला दिनांक 13 तारखेला मुलाला कुसुंबा येथून गाडीत बसवले व *”मोरणे-मनेर येथील कोरनटाईन सेंटर”* गाठले दोघेही तेथे भरती झालो डॉक्टरांनी औषध उपचार सुरू केले.मला सात दिवसापासून अन्न पोटात नसल्याने दिनांक 14 तारखेचा च्या रात्री प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. छातीत कळा येऊ लागल्या त्याच वेळी माझे मित्र प्राध्यापक सुभाष परदेशी आय टी आय फोरमन यांचा फोन आला.माझा खोल गेलेला आवाज एकूण तर त्यांना रडूच कोसळले त्यांनी प्राचार्य ईश्वर सरांना ही बातमी सांगितली. सरांचा फोन येईपर्यंत मी व माझा मुलगा महेश खूपच घाबरलो होतो. सरांनी ताबडतोब नाशिकला फोन करून बेड उपलब्ध आहे का चौकशी केली डॉक्टर तुषार चव्हाण यांना सांगून धुळे येथे हे श्रद्धा हॉस्पिटलचा बेड उपलब्ध करून देण्याची विनंती केली मी काॅरणटाइन सेंटरच्या डॉक्टर बोरकरांना माहिती दिली. त्यांनी ताबडतोब ॲम्बुलन्स ला फोन केला व सिविल हॉस्पिटल ला हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या परंतु डायरेक्ट ना ॲम्बुलन्स उपलब्ध झाली ना बेड… मी तसाच रात्रभर स्वामी समर्थांच्या धावा करत राहिलो. मला रात्री बदलून बदलून गोळ्यांचा प्रयोग माझ्यावर केला गेला त्यात रात्री मला केव्हा झोप लागली कळाले सुद्धा नाही.
पंधरा तारखेच्या पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटात सकाळी मला जाग आली तेव्हा मात्र मला कमालीचे फ्रेश वाटत होते. *”आई श्री चामुंडा माता व स्वामी समर्थाची कृपा”* माझ्यावर झाली होती. माझ्यासाठी ज्या ज्या समाज बांधवांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली होती देवाने ती प्रार्थना ऐकूण माझ्या तब्येतीत स्वास्थ निर्माण केले होते.छातीत होणाऱ्या प्रचंड वेदनाही ही थांबल्या.मला आता वाटत होते दिनांक 7 ते 15 तारखेपर्यंत अन्नाचा कण पोटात नव्हता या नऊ दिवसात प्रचंड अशक्तपणा व थकवा दुपारच्या जेवणाने गेला होता.16 तारखेपासून तोंडाला अन्नाची चव आली होती व आता मला बरे वाटत होते यादरम्यान माझ्या चांगल्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक नंथू अण्णा बोराडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे,प्राचार्य ईश्वर बडगुजर मुकटी, महासमितीचे अध्यक्ष श्री.माधवराव जानकीराम बडगुजर,प्रा.एच.आर.बडगुजर, माजी अध्यक्ष सुरेश मगन बडगुजर,पनवेलचे भगवान लक्ष्मण बडगुजर, रमेश वामन बडगुजर ठाणे,अशोक वामन बडगुजर,संतोष दिगंबर बडगुजर, पंडित अण्णा नंदवाळकर, पी.डी.बडगुजर जळगाव, विकास पुंडलिक बडगुजर,भिला गुरुजी लीलाधर बडगुजर,राजेंद्र पवार, भुसावळचे सुरेश महाले,नंदलाल पवार,सौ.ज्योती ताई बडगुजर,सौ लताताई बडगुजर,सौ रत्ना ताई बडगुजर, सौ भावना ताई बडगुजर औरंगाबाद सुरतचे अध्यक्ष मोहन वसंत बडगुजर, पानसमेळचे विजय श्रीधर बडगुजर,श्री मनोहर बन्सीलाल बडगुजर,श्री अशोक सिताराम बडगुजर,श्री प्रवीण गोपीचंद बडगुजर,श्री प्रणव कोतवाल,श्री राजेंद्र दिगंबर नंदवाळकर,पुण्याचे चव्हाण,प्राचार्य आर आर ह्याळीद ,श्री भगवान गंगाराम बडगुजर, नाशिकचे मनोहर चौधरी,संतोष भिला बडगुजर, ॲड.सुरेश बडगुजर,श्री बुधा बडगुजर,बीडगावचे VO पाटील,माजी अध्यक्ष श्री उमेश हिरालाल करोडपती,श्री प्रकाश नागो बडगुजर,श्री देवराम चव्हाण नाशिक. श्री ज्ञानेश्वर मोरडीया कल्याण,श्री शालिग्राम धनजी बडगुजर आसनगाव,श्री महेश बडगुजर नाशिक,श्री राजेंद्र मुरलीधर बडगुजर पाचोरा,श्री सी डी साळुंखे धुळे,श्री लोकेश कोतवाल पुणे,श्री निंबा बाबुराव बडगुजर फागणे,श्री केशव बापू बडगुजर फागणे,श्री रवींद्र दयाराम बडगुजर शिरपूर, ॲडवोकेट सुनील मुकुंदा बडगुजर जळगाव,श्री संजय बडगुजर पारोळा,श्री प्रशांत लालचंद बडगुजर धुळे,श्री रतीलाल हरचंद बडगुजर मुकटी सर्व समाज बांधवांसह माझे सहकारी मित्र मंडळी सर्वांनी माझ्यासाठी परमेश्वराकडे चांगल्या आरोग्यासाठी विनंती केल्याने आज मी पूर्ण बरा होऊन दवाखान्यातून सुखरूप घरी परत आलो आहे
*सर्वांनी Mask – सॅनीटायझर वापरा व सुरक्षित अंतर ठेवा सुरक्षित रहा हीच सर्वांना विनंती.*


उदंड आविश्याच्या शुभेच्छा