प्रबळ इच्छाशक्तीमुळे कोरोना वर मात केली श्री.ईश्वर बडगुजर मुकटी.. आपल्याला कोरोना होऊ नये म्हणून प्रचंड खबरदारी ,उपायोजना करूनही चोरपावलांनी कोरोनाने मला टिपलेचं! साधा ताप ,खोकला, अंगदुखी मुळे धुळ्यातील डॉक्टर तुषार भगवान चव्हाण (एमडी) तसेच डॉक्टर मयुर संजय नंदवाळकर(एमडी) यांच्याकडे तपासणी केली असता कोरोना व न्यूमोनिया झाल्याचे समजले .लगेच डॉक्टरांनी मला नाशिक येथे उपचार करण्यासाठी चा सल्ला दिला पण त्यावेळी रात्र झाल्यामुळे मी स्वतः धुळ्यातील एका कोरोणा हॉस्पिटलमध्ये दाखल झालो.
हॉस्पिटल मध्ये माझी उपचारची व्यवस्था करण्याची सोयही केली .परंतु त्या हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार न झाल्याने निमोनिया चे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले व श्वसनाचा त्रास सुरू झाला. तीन दिवस होऊनही तब्येतीत सुधारणा नव्हती. माझी तब्येत चिंताजनक झाल्याची वार्ता मुकटी गावासह परिसरात व धुळे शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्या वेगाने सामाजिक व राजकीय कार्यकर्ते पत्रकार मंडळी मित्रमंडळी मोठ्या संख्येने हॉस्पिटलच्या आवारात जमले. माझे आश्रयस्थान असलेले मा. आमदार श्री. राजवर्धन जी कदमबांडे यांनी हॉस्पिटल प्रशासनाला खडे बोल सुनावले. त्यामुळे तात्काळ नासिक हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी ऑक्सीजन सह अंबुलन्स व्यवस्था झाली. उपस्थित हितचिंतकांची गर्दी पाहून मन गहिवरून आले. एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जीव ओवाळून टाकणारे सच्ची माणसे आणि त्यांचे प्रेम पाहून मनाला धीर येत होता. त्यांचे हिंमत वाढविणारे शब्द मला कोरोनाशी लढण्याचे बळ देत होते .माझ्यात जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती निर्माण झाली .मी माझे शरीर व मन कठोर केले .मी कोरोनाला हरविणारचं! अशी भीष्मप्रतिज्ञा घेऊन महादेव, कुलस्वामिनी चांमुडा माता देवी व माता पित्यांचे स्मरण करून ॲम्बुलन्स ने नाशिकच्या मार्गस्थ लागलो. अवघ्या अडीच तासात नाशिक येथील नामांकित 'पेनाशिया' हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. डॉ.प्रीतम अहिरराव, डॉ. नरेश पाटील व मेडिकल टीमने तात्काळ उच्च स्तरावरील ट्रीटमेंट सुरू केली ऑक्सीजन लावल्यामुळे मला फारसे काहीच कळत नव्हते. फक्त सर्व मेडिकल स्टॉप चांगलीच धावपळ करीत असल्याचे मला जाणवत होते. दि 29 व दि 30 ऑगस्ट हे दोन दिवस फार जिकरीचे गेलेत. मी अक्षरशः जीवन आणि मृत्यू यांच्यात गुरफटलो होतो. मात्र हिंमत सोडली नाही .15 दिवसाच्या संघर्षानंतर मृत्यूशी झुंज देत दि. 12 सप्टेंबर रोजी सर्वांच्या आशीर्वादाने स्वगृही परतलो. तरीही पुढील 20 दिवस घरीच खबरदारीने राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अशा गंभीर परिस्थितीत मला अनेकांनी मदत ,सहकार्य व मार्गदर्शन केले. राजेंद्र भालचंद्र बडगुजर (कुसुंबा) डॉ .राहुल कुवर, राजेंद्र शर्मा, चुनीलाल पाटील (अंचाळे )गुलाबराव आनंदराव पाटील ,नगराज पोपटराव पाटील ,मनोहर बन्सीलाल बडगुजर ,भगवान श्रीधर चौधरी, पी. डी बडगुजर सर जळगाव, विकास पुंडलिक बडगुजर जळगाव, गोकुळ राजपूत ,विश्वनाथ नगराज सैंदाणे, प्रमोद वाणी, नथू अण्णा बडगुजर बोराडी,डॉ. अनिल वाणी ,सुभाष दादा चौधरी, जी .एस. सैंदाणे सर भावंडे बालचंदभाऊ, व रतिलालभाऊ व आपले सर्व बडगुजर समाज बांधव आदींसह मित्रमंडळी माझा परिवार यांनी मोलाचे सहकार्य केले. नाशिक हॉस्पिटलमध्ये असतांना नगरसेवक सुधाकर भाऊ बडगुजर, प्रा. विशाल अनिल पाटील (शिंदे )शिरपूर, प्रा. प्रशांत प्रकाशशेठ बडगुजर .देवराम भटू सेठ चव्हाण ,संतोष भिलाजी बडगुजर, गोविंद जगन्नाथ बडगुजर, उमेश आप्पा करोडपती पारोळा,दत्तात्रय बडगुजर, भालचंद लकडू सेट बडगुजर तसेच मुलगा भूषण व पुतण्या गणेश यांनी मदत केली. या गंभीर परिस्थितीत समाज कार्यकर्ते ,नातेवाईक मित्रमंडळी ,पत्रकार मंडळी, ग्रामस्थ व शाळेतील सर्व स्टॉप यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईल द्वारे माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. व तब्येत बरी होण्याची शुभकामना केली. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. मी सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. ही नम्र विनंती. धन्यवाद
यानिमित्ताने सर्वांना नम्र प्रार्थना..
कोरोना होऊ नये म्हणून खबरदारी घ्या. हलक्या वर घेऊ नका. गाफील राहू नका. प्रत्येकाशी लांबून बोला. मास्क व सैनी टायझर चा उपयोग करा. गर्दीमध्ये जाऊन कोरोना ला आमंत्रण देऊ नका .घरातही सुरक्षित रहा. कारण पुढील काळ सामूहिक संसर्गाचा आहे .दैनंदिन कामाबरोबर सकस आहार ,पहाटे पायी चालणे, व्यायाम ,आवश्यक झोप व प्राणायाम करा. आनंदी व चिंतामुक्त जीवन जगा. सर्व दक्षता घेऊनही नजरचुकीने कोरोना झाला तर भिऊ नका.वेळेवर औषध उपचार करा .वेळोवेळी सर्व तपासण्या करून घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रिटमेंट घेतल्यास कोरोना पासून लवकर मुक्तता होते. कोरोनाशी लढण्याची मानसिक तयारी करून ठेवा. कोरोनाची मनात भीती बाळगू नका. खचला तो संपला. जीवन जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती असू द्या. जीवन अनमोल आहे .ते पुन्हा पुन्हा मिळत नाही. आपणही आपल्या परीवाराची काळजी घ्यावी शेवटी, देशावर उद्भवलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होवो. हि प्रभू चरणी प्रार्थना ??


Leave a Reply