जळगाव येथील भूषण प्रताप चव्हाण (बडगुजर) गायन स्पर्धेत भारतात चौथा तर महाराष्ट्रात प्रथम : प्रा.सी.डी.साळुंखे

जळगाव येथील श्री.प्रताप सिताराम चव्हाण,यांचा मुलगा भूषण याने ऑल सेंटस् कॉलेज, त्रिवेंद्रम, हारमोनी म्युझिक क्लब तर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने “नॕशनल सिंगीग कॉंम्पीटिशन फॉर टीचर्स, ऑनलाईन स्पर्धा दि.२/९/२०२० रोजी घेणेत आली. सदर स्पर्धेत भारतातून १९० स्पर्धकांनी सहभागी झाले. जळगावच्या भूषण ने गीतकार प्रकाश मेहरा रचीत “और इस दिल मे क्या रखा है..तेरा ही दर्द छूपा रखा है” हे इमानदार(१९८७)च्या चित्रपटातील गीत ऑनलाइन सादर केले. सदर स्पर्धेसाठी जज्ज म्हणून डॉ.आर.श्रीलेखा, सेवा निवृत्त अधिष्ठाता, संगीत फॕकल्टी, केरळ, कलामंडलम व श्री.सतीष रामचंद्रन, प्रसिध्द संगीत दिग्दर्शक तथा संस्थापक दिग्दर्शक देवार्जन मेमोरियल ट्रस्ट यांचे पॕनेल तर्फे निकाल जाहिर करणेत आला.

भारतातील १९० स्पर्धकातून भूषण चव्हाण,या खान्देश पुत्रास चौथा तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने गौरविण्यांत आले. सदर कार्यक्रम ५ सप्टेंबर २०२० शिक्षकदिनी १०.३० ते १२.३० लॉईव्ह प्रोग्राम यू ट्यूबवर प्रदर्शित होणार आहे.

भूषण प्रताप चव्हाण हे श्री. प्रताप सिताराम चव्हाण (वडील), सौ.सुनीता (आई), श्री.रामदास बंडू बडगुजर(आजोबा), प्रा.संजय बडगुजर, संगीत विशारद (मामा), डॉ.नितीन बडगुजर (मामा) यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आ.भा.बडगुजर समाज युवक समिती,वेब पोर्टल टीम व बडगुजर प्राऊड टीम तर्फे भूषण चव्हाणचे कौतुक/अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.

4 Comments

  1. श्री चंद्रकांत पितांबर बड गुजर ऐरोली नवी मुंबई
    September 5, 2020 at 11:40 am

    मनपूर्वक अभिनंदन िची भूषण चव्हाण यांस मिळवलेल्या यशाबद्दल समस्त बड गुजर समाज गायन क्षेत्रातही अग्रस्थानी आहे महाराष्ट्रात प्रथम क्रमांक म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग
    बड गुजर उत्कर्ष मंडळ कल्याण व पाक्षिक बड गुजर दर्शन यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !!!!

  2. भुषण आपल्याला मिळाल्याबद्ल हार्दिक अभिनंदन !!!

Leave a Reply to Ashok Shankar Badgujar , चोपडा Cancel reply

Your email address will not be published.


*