मी श्री संतोष बडगुजर 29 जुलै 2020 ला श्री पी.डी.बडगुजर सरांना फोन केला. जळगाव जिल्ह्यातील कढोली येथील इ.१० वीचा विद्यार्थी चि.शुभम प्रमोद बडगुजर या विद्यार्थ्याला SSC ( माध्यमिक शालांत परीक्षा) बोर्डात 97 % टक्के गुण मिळाले. अत्यंत हुशार मात्र घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यातच त्याचे वडीलांची छत्रछाया नाही. अशा परिस्थितीत शिक्षणातून संन्यास घेणाऱ्या या हुशार विद्यार्थ्यांसाठी कुठून मदत मिळवता येईल का? असा प्रश्न मी श्री.पी.डी.बडगुजर सर यांच्यासमोर उभा केला. माझे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच त्यांनी त्या विद्यार्थ्याचा ॲडमिशनचा सर्व खर्च मी करेल असे सांगितले. तसेच शैक्षणिक खर्च पेलता यावा म्हणून त्याला वार्षिक स्वरूपात मदत न देता दर महिन्याला एक तारखेस हजार रुपये स्वतः देण्याचे कबूल केले. सदरच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सरांनी हा निर्णय घेतला. कारण वार्षिक मदत एकदाच होते व गरजेनुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घ्यावे लागते व परिक्षा फी ही भरावी लागते. म्हणून दरमहा ही मदत करावयाचे ठरविले तसेच मी समाजातुन दोन हजार रुपये गोळा करून प्रतिमहिना त्या विद्यार्थ्यास तीन हजार रुपये देण्याचा त्यांनी शब्द दिला. वास्तविक सरांचे आणि माझे कुठलेही नाते नाही. समाजकार्याच्या माध्यमातून सरांची आणि माझी ओळख झाली आहे.
सर नेहमी समाजकार्यात आर्थिक स्वरूपात तसेच शारीरिक व मानसिक रित्या सहभाग नोंदवत असतात. (म्हणजेच तन-मन-धनाने )अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती चे कार्यकारणी सदस्य, शिक्षण समितीचे प्रमुख, बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव चे माजी सचिव, एक आदर्श व्यक्तिमत्व श्री पी डी बडगुजर सर यांनी समाजकार्यात निस्वार्थी व विश्वासू प्रतिमा निर्माण केली आहे. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय स्तरावर गुणगौरव व सत्कार करणे, त्यांना प्रोत्साहन देणे व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत असतात. व समाजातील युवा वर्गातर्फे घेण्यात येत असलेल्या शैक्षणिक उपक्रमास मदत करणे हे सरांचे कार्य अधोरेखित करण्यासारखे आहे.
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती मध्ये अशा सरांसारखे महत्वकांशी, समाज प्रेमी, समाज हितचिंतक व्यक्तिमत्व आहेत म्हणून अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचा झरा कधीही आटणार नाही. वर्षातून एकदा १००० रुपये देऊन विद्यार्थ्यांना मदत दिली जाते. मात्र सरांनी महिन्याला ३००० हजार रुपये मिळवून देण्याचा संकल्प केला. ही मदत चि. शुभम साठी मोलाची ठरणार आहे. त्याला प्रेरक ठरणार आहे. शिक्षण समिती ती खरंच प्रसिद्धीसाठी नाही तर समाज हितासाठी कार्य करीत असते याची प्रचिती यांच्या प्रमुखांच्या विचारसरणीतून दिसून येते…..
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर नेहमी असेच फुलत राहो… वसुंधरेचे अगणित सूर्य तुमच्यासाठी तळमळत राहो असे अद्वितीय कार्य आपल्या हातून घडो ही आमच्या परिवाराकडून सदिच्छा….. ??
श्री. संतोष भिला बडगुजर ज्येष्ठ नागरिक नाशिक

Abhinandan…Saraswati mission che karya atishay uttam aahe !
मा.श्री.पी.डी.बडगुजर सर, सप्रेम नमस्कार !
आपण चि.शुभमला पुढील शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला. त्याला मिळणारी सदर मदत त्याच्या पूढील शिक्षणासाठी फारच मोलाची ठरेल. सर, समाज आपला सदैव ऋणी राहील. आपण समाजाचे भूषण आहात. कारण, आपल्यासारखे समाज सेवक असतील तर निच्चीतच समाजाची प्रगती होईल. खरोखरच खुप छान कार्य आपल्या हातून घडते आहे. तुमचे खुप खुप आभार ! धन्यवाद व मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! ???