यावर्षी कोरोनाचे सावट असल्या कारणाने यावर्षीचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने आणि काळजीपूर्वक साजरा केला जातोय. या परिस्थितीची जाणीव ठेवत आपले समाजातील गीतकार, संगीत विशारद श्री. गणेश भास्कर बडगुजर यांनी गणपती साठी गजानना श्री गणराया हे गाणे आपण सर्वांसाठी युट्यूब व्दारे प्रकाशित केले आहे.
श्री. गणेश बडगुजर हे यावल येथील रहिवासी असून त्यांनी B. A. Music (संगीत विशारद) केले आहे. ते सध्या जे. टी. महाजन कॉलेज, फैजपूर येथे संगीत शिक्षक आहेत व स्वतः ते म्युझिक कम्पोजर, डायरेक्टर तथा गायक आहेत.

याआधीही श्री. गणेश बडगुजर यांनी नवरात्री मध्ये चामुंडा मातेचे भक्तीभाव पुर्ण गीत गायले होते व ते सुपरहिटही ठरले. यावेळी गणेशोत्सव चा निमित्त साधून त्यांनी हे गाणे तयार केले आहे.
त्यांनी स्वतःच हे गाणे डायरेक्ट केले व गायले सुध्दा आहे. मल्टीटास्किंग व्यक्तीमत्व श्री. गणेश बडगुजर सर यांच्या युट्यूब Chanel ला आपण सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करावे.
श्री. गणेश सर हे फैजपूर येथील जे. टी . महाजन इंग्लिश स्कूल मध्ये संगीत शिक्षक आहेत.
आपण हे गाणे यु – ट्यूब वर पाहू शकता.
गाण्याचे प्रसिद्ध गाण्याचे बोल खालील प्रमाणे आहेत :
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
सिंदुरचर्चित धवळे अंग, चंदनउटी खुलवी रंग बघता मानस होते दंग,
जीव जडला चरणी तुझिया, आधी वंदू तुज मोरया !
मराठीतील हे प्रसिद्ध गाणे /रचना पूण-निर्मित करून गणेश सरांनी स्वतः गायली आहे.

Leave a Reply