वसई येथील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते तसेच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री. दिपक मधुकर बडगुजर यांची नुकतीच वसई येथील लायन्स क्लबच्या अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली !
मुंबई परिसरात सामाजिक कार्य करणा-या संस्थेच्या ( लायन क्लब ) अध्यक्ष पदावर, निवड झालेले दिपक बडगुजर हे तिसरे बडगुजर आहेत. पनवेल,उल्हास नगर येथील लायन क्लब चे अध्यक्ष म्हणून यापूर्वी श्री. मदन बडगुजर व श्री.अशोक बडगुजर यांची निवड झाली होती. श्री दिपक बडगुजर हे वसई शहरात अनेक सामाजिक कार्यात सहभागी असतात. ते शिवसेना चे पदाधिकारी आहेत. आदिवासी साठी आश्रम शाळा चालवितात. प्रत्येक वर्षी आदिवासींना कपडे, शालीय वस्त, पुस्तके वाटप करीत असतात.
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई बडगुजर दर्शन च्या कार्यकारीनी मंडळात दिपक बडगुजर यांनी काम पाहिले आहे ! मंडळाचे कार्यात सक्रिय असतात ! अ.भा.ब.स.म.स.च्या प्रथम कार्यकारी सदस्य ( २०१३ ते २०१६ ) म्हणुन त्यांनी योगदान दिलेले आहे ! तसेच समाजाला डिजीटल
व्यासपीठ तयार करण्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केलेत. बडगुजर. इन या वेब पोर्टलचे ते प्रमुख मार्गदर्शकांपैकी एक आहेत. बडगुजर. इन हे सामाजिक घडामोडी आपल्याला एका क्लिक वर उपलब्ध करून देते त्याचा पाया घडणीच्या कामाचे ते शिलेदार आहेत व सदैव युवा टिमला मार्गदर्शन करीत असतात.
लायन्स क्लब इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय-राजनैतिक सेवा संस्था आहे. जी मूळची शिकागो येथे १९१७ मध्ये स्थापन झाली. चांगल्या सरकार आणि चांगल्या नागरिकतेच्या तत्त्वांचा प्रचार करणे. समुदायाच्या नागरी, सांस्कृतिक, सामाजिक आणि नैतिक कल्याणात सक्रिय रस घेणे. मैत्री, चांगली फेलोशिप आणि परस्पर समंजसपणाच्या बंधनात क्लब एकत्र करणे – असे नानाविध कार्यक्रम लायन्स क्लब विविध शाखांच्या माध्यमातून घेत असते. अश्या ह्या लायन्स क्लब, वसई चे नवीन अध्यक्ष नक्कीच हा वसा पुढे नेतील…
लायन्स् क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपतर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
- रमेश वामनराव बडगुजर ( ठाणे )


Very proud of you.Let you good work continue for the betterment of the society.God bless you.