सर्व समाज बांधव व भगिनींना कळविण्यात आनंद होतो की, बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद कार्यकारिणीतील रिक्त झालेल्या पदावर व नविन निर्मित पदावर खालील समाज बांधवांची नियुक्ती करण्यात येत आहे.
1) कार्याध्यक्ष– श्री.संजय महादुशेठ बडगुजर (अध्यक्ष यांचे बरोबरीचे नवनिर्मित पद)
2) उपाध्यक्ष – श्री. जितेंद्र भास्कर शेठ बडगुजर, औरंगाबाद शहर विभाग (श्री.सुनिल पंडीतशेठ बडगुजर यांच्या रिक्त झालेल्या पदी)
3) उपाध्यक्ष– श्री.रुपेशकुमार बापुराव बडगुजर, बजाजनगर विभाग, औरंगाबाद ग्रामीण (श्री.संजय महादुशेठ बडगुजर यांच्या रिक्त झालेल्या पदी)
3) सचिव – श्री.हर्षल सुरेशशेठ बडगुजर (श्री.चंद्रकांत खंडुशेठ बडगुजर यांच्या रिक्त झालेल्या पदी)
4) कोषाध्यक्ष – श्री.निलेश भिकाशेठ बडगुजर (श्री.रविंद्र हिरालालशेठ बडगुजर यांच्या रिक्त झालेल्या पदी)
5) प्रसिद्धी प्रमुख– श्री.चंद्रकांत दगडुशेठ बडगुजर (नवनिर्मित पद)
6) शिक्षण व रोजगार प्रमुख– श्री.प्रदीप लक्ष्मणशेठ बडगुजर (नवनिर्मित पद)
7) संघटक– श्री.शिवचरण बडगुजर, खुल्ताबाद (श्री.रुपेशकुमार यांच्या रिक्त झालेल्या पदी)
बडगुजर समाज मंडळाच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळेस एकमताने एक प्रभावशाली निर्णय घेतला आणि समाजातील तरूणांना समाजकार्याची संधी देण्यात आली. समाजकार्यात हल्ली युवावर्गाचा सहभाग वाढत आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवनवीन उपक्रम समाजात राबविणे ही काळजी गरज आहे. आजचे युग हे डिजीटल युग आहे. आज आपल्या समाजात डिजीटल व्यासपीठेही तयार होऊन बरेचसे ऑनलाईन उपक्रम राबविले जातात. आणि या सर्व बाबींमध्ये युवकांचा समावेश महत्वपुर्ण ठरत आहे. याकरीता औरंगाबाद समाज मंडळाने एक अभुतपुर्व निर्णय घेत मंडळाची धुरा युवा टिमकडे सोपविली. हा निर्णय समाज हिताचा असून यातून अमुलाग्र बदल घडून समाजकार्याला नवी दिशा मिळेल. औरंगाबाद समाज मंडळ नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असते. गेल्यावर्षी समाजातील सर्व युवा सामाजिक कार्यकर्त्यांना एकाच व्यासपीठावर एकत्रित आणून सत्कार करण्यात आला होता. बडगुजर समाजातील हा पहिला असा कार्यक्रम होता ज्यात फक्त युवा कार्यकर्ते व्यासपीठावर होते.

Leave a Reply