ज्येष्ठ समाजसेवक कै. पंढरीनाथ काळू शेठ बडगुजर (फुपनगरी) दिनांक ४ ऑगस्ट २०२० प्रथम पुण्यस्मरण

ज्येष्ठ समाजसेवक कै. पंढरीनाथ काळू शेठ बडगुजर (फुपनगरी) दिनांक ४ ऑगस्ट २०२० यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे. कै. पंढरीनाथ काळू शेठ बडगुजर हे मुळचे फुफनगरी येथील रहीवासी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कानळदा, जळगांव येथे झाले. ते अतिशय हुशार विद्यार्थी होते. इयत्ता १० वी मध्ये जळगांव जिल्हात प्रथम व आपल्या समाजात त्याकाळी क्रमांकांने उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी ग्रामसेवक ची परिक्षा पास करून ग्रामसेवक पदावर नियुक्त झालेत. पदावर रूजू असतांना त्यांना शासनामार्फत बी. एस्. सी. कृषी पदविका शिक्षण करणेसाठी दापोली येथे पाठविण्यात आले.बी. एस्. सी. कृषी पदविका पूर्ण करून त्यांची कृषी विस्तार अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी चोपडा, एरंडोल, जळगांव याप्रभागाचे काम पाहिले.

त्यांचे समाजाशी जवळचे संबंध होते. जेष्ठ समाज सेवक आणि समाजासाठी काही करण्याची त्यांची प्रबळ इच्छाशक्ती होती. त्यांना पी. के. बडगुजर म्हणून ओळखत असत.

त्यांना तीन मुले व तीन मुली
श्री. राजेन्द्र पंढरीनाथ बडगुजर, निवृत्त पोलिस कॉन्स्टेबल, श्री. संजय पंढरीनाथ बडगुजर, समाजसेवक स्क्रीन प्रिंटिंग प्रेस, Advt. श्री. मिलिंद पंढरीनाथ बडगुजर, जळगाव न्यायालयात आहेत.

श्रीमती प्रतिभा सुभाष बडगुजर, मुलगी,
सौ. माधुरी यशवंत चव्हाण, मुलगी,
सौ. मनिषा चंद्रकांत बडगुजर, मुलगी
सुना नातवंड असा परिवार आहे.

या सर्वांतर्फे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त विनम्र अभिवादन ?????????

1 Comment

  1. श्री चंद्रकांत पितांबर बड गुजर ऐरोली नवी मुंबई
    August 4, 2020 at 6:54 am

    विनम्र अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published.


*