बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव च्या वतीने विनम्र आवाहन – श्री. लिलाधर बडगुजर, जळगांव

? विनम्र आवाहन ?
नमस्कार समाज बांधवांना आम्ही बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव च्या वतीने आपणास नम्र निवेदन करतो कि जळगाव विद्या प्रसारक मंडळाचे वसतीगृह हे जळगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी दोन टप्प्यात बांधण्यात आले होते. पहिला टप्पा हा साधारणतः १९७८ साली व दुसरा टप्पा हा १९९० साली बांधण्यात आला. त्यावेळच्या समाज मान्यवरांनी बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव या नावाने १९७३ साली संस्था स्थापन करून धर्मदाय आयुक्त यांचेकडून रीतसर रजिस्टर करून घेतली. तदनंतर समाज बांधवांकडून देणग्या गोळा करून वसतिगृह बांधले. त्याकाळात त्यावेळेस उपलब्ध बांधकाम साहित्यातून त्यांनी वसतीगृहाचे बांधकाम केले व बडगुजर समाजाचे विद्यार्थ्यांकरीता जळगाव शहरात राहण्याची सोय केली.
त्या काळात असलेले समाज मान्यवर श्री देविदास विठ्ठल शेठ, श्री पंडितराव ओंकार सेठ ,श्री भटू गणपत शेठ पवार , श्री द.शं बडगुजर, श्री द.बा. बडगुजर , श्री आर.एन.पाटील, श्री भिला गुरुजी, श्री शंकर विठ्ठल शेठ पवार, श्री सखाराम रावजी सेठ, श्री पुंडलिक काळूसेठ, श्री मांगो रामदास सेठ आदी अनेक मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ व श्रम याठिकाणी दिला त्याबद्दल संपूर्ण समाज त्यांचा सदैव ऋणी आहे व राहील.समाज बांधवांनी त्याकाळात बांधलेले वसतीगृह हे योग्य होते. परंतु काळानुरूप त्यात बदल करणे आवश्यक होते व आहे. वसतिगृहावर काळानुरूप सोइ सुविधांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक होते परंतु आधुनिकीकरण न झाल्यामुळे विद्यार्थ्यी वसतीगृहात राहण्यास नापसंती दर्शवित असतात. काहीच सुधारणा न झाल्यामुळे वसतीगृह हे अतिशय जुन्या काळातील वाटते,त्याचा परिणाम विद्यार्थी संख्येवर, तथा त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर होत असतो. सुधारणा नसल्यामुळे विद्यार्थी भाडे वाढवून देण्यास तयार नाहीत सुविधा नसल्यामुळे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी याठिकाणी येत नाही. भाडे कमी प्राप्त होत असल्यामुळे संस्थेचाही आर्थिक ताळेबंद जुळून येत नाही.
त्यासाठी कार्यकारी मंडळाने वसतिगृहाचे आधुनिकीकरण करावयाचे ठरवले आहे त्यात जुने प्लास्टर काढून नवीन करणे, सिलिंगचे प्लास्टर नवीन करणे, लाकडी पाट्याच्या खिडक्या काढून अल्युमिनियम च्या स्लाइडिंग विंडो लावणे, जुन्या लाकडी फळीचे दरवाजे काढून नवीन फ्लश डोअर बसविणे, तसेच फ्लोरिंग म्हणजे जुनी फरशी काढून नवीन वेट्रीफाईड टाइल्स बसवणे, संपूर्ण वसतिगृहाला आतून व बाहेरून रंग रंगोटी करणे, विद्यार्थ्यांसाठी त्यांची पुस्तके ठेवण्यासाठी कपाटे तयार करणे, वॉश बेसिन बसवणे,प्रसाधन गृहाची दुरुस्ती करणे, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसवणे, फ्री वायफाय सुविधा देण,तसेच वर्षानुवर्ष गच्ची गळत होती तिचे वॉटरप्रूफिंग करणे इत्यादी इतर कामे करावयाची आहेत .पूर्वीच्या काळात वसतिगृहाचे बांधकाम हे समाज बांधवांच्या देणगीतूनच पूर्ण झाले होते. यावेळेसही समाज बांधव भरभरून देणगी देतील अशी अपेक्षा मंडळ समाज बांधवांकडून ठेवत आहे.
यासाठी देणगी देणाऱ्यांची नावे मंडळ हे काळ्या रंगाच्या ग्रॅनाईट वर सोनेरी रंगात लिहून कायमस्वरूपी भिंतीवर लावणार आहे तसेच जे दानशूर बांधव एका खोलीच्या संपूर्ण दुरुस्तीची रक्कम देणगी म्हणून देतील त्यांची नावे खोल्यांच्या बाहेर ग्रॅनाईट वर लिहून कायमस्वरूपी लावण्यात येतील. समाज बांधवांना मंडळाकडून नम्र आवाहन करण्यात येते की आपण उदारहस्ते देणगी देऊन वसतीगृहाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलावा ही नम्र विनंती.
आपण आपली देणगी ही बडगुजर विद्या प्रसारक मंडळ, जळगाव च्या नावाने चेकच्या स्वरूपात देऊ शकतात, तसेच ऑनलाइन देखील पाठवू शकतात त्याकरीता संस्थेचे बँक खाते हे कॉर्पोरेशन बँक लि शाखा जळगाव येथे असून त्या बँकेचा IFSC कोड CORP००००३७९ असा आहे व अकाऊंट क्रमांक ५२०१०१२६०१६१९९३ असा आहे. आपली देणगी प्राप्त झालेवर आपणास पावती पाठवण्यात येईल. कृपया लक्षात घ्या संस्थाही नोंदणीकृत आहे. संस्थेचे ऑडिट हे मान्यता प्राप्त चार्टड अकाऊंटंट यांचे कडून दरवर्षी करण्यात येत असते .
? धन्यवाद?

?अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या मान्यवर यांचेशी संपर्क साधावा. ?
श्री लीलाधर बडगुजर,9422271469
श्री सुरेश महाले 9422773849
श्री गोविंद पुंडलिकसेट 7057069308
श्री बिपीन पठार 7020118368
श्री विकास पुंडलिकसेट 9423937497
श्री पी डी बडगुजर सर 9420108615
श्री राजेंद्र पवार 9422780950
श्री मधुकर बडगुजर 9923710987
श्री प्रदीप पवार 9595281308
श्री दत्तात्रय निंबा 9823225326
श्री राजेंद्र पवार सर 9421523612
सौ ज्योती बडगुजर 9823017620
सौ संगीता बडगुजर 9421520346
? ? ? ? ?

1 Comment

  1. या वसतिगृहाचे बांधकाम सागोळ/ चुन्याचे असून त्याच आयुष्य संपले आहे. कितीही दुरुस्ती उपयोगी नाही. शिवाय असे कुठलेही काम जनरल सभेत ठेऊन मंजुरी घेऊनच सुरू केले पाहिजे. अन्यथा ते बेकायदा होईल.
    हे वसतिगृह पाडून, जनरल सभेत मान्यतेने चांगले दोन मजली इमारत होऊ शकेल.

Leave a Reply to Shantaram Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*