व्यवसाय मार्गदर्शनपर मालिका – भाग १ – बिझनेस कोणी करावा – श्री. शैलेश बडगुजर, पुणे, युवा उद्योजक

काेराेनाच्या संकटामुळे आज अर्थव्यवस्थेची घडी विस्कटलेली आहे. अनेकांना नाेकऱ्या गमवाव्या लागल्या आहे. नाेकरी गेल्यामुळे आता पुढे काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात व डाेक्यात घर करुन बसला आहे. काेराेनाच्या संकटात उभे आयुष्य नाेकरीत घालून सेफ झाेनचा खाेटा विश्वास मनात बाळगून असणारी ‘नाेकरधारी’ मंडळी बेराेजगार झाली आहे तर बिझनेस करणारी मंडळी ऑनलाईन व इतर मार्गाने का हाेईन चांगल्या पद्धतीने राेजगार करीत आहे. त्यामुळे आता बिझनेस करणे हेच सेफ झाेन मानले जात आहे. या विषयी मी (शैलश भरत बडगुजर) साेशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शक नव्हे पण नक्की मदत करणारी मालिका लिहण्यास सुरुवात केली आहे. ती नक्कीच आपणांंस आवडेल व अआपल्या प्रतिसादानंतर तीची विण मी अधिक घट करेल. चला तर मग जाऊ या ‌थेट मालिकेकडे….

वृत्त मालिका भाग -१ – बिझनेस कुणी करावा…?

भरकटलेल्या तरुणाईला व मनात विचारांचे काहूर माजलेल्या बऱ्याच जणांना हा प्रश्न नेहमी सतावतो. यात मग जे शिक्षण घेऊन आताच बाहेर पडलेत किंवा ज्यांनी नोकरीत १० ते १५ वर्ष खर्च केलीत असे सहज उत्तर पुढे येेते; पण याचे उत्तर मुळात स्वतः मध्येच दडलेले अाहे. प्रत्येकाकडे काहींना काही बिझनेसचे विचार असतात. फक्त ते सत्यात उतारवायला याेग्य वेळ लागतो. कारण जागा, पैसे, वेळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या असे बरेच प्रश्नांचा विचार होतो आणि प्लॅन पुढे सरकतो. तरुण मुले युट्युबवर काही तरी बिझनेसची अायडिया पाहून घरी वडीलधाऱ्या मंडळीना सांगतात आणि मग घरून ठरलेली उत्तर मिळतात. यात ते म्हणजे असे की…..

१. असा व्हिडीओ देखीसणी धंदा व्हस का ?
२. धंधा वालासले कोणी पोरी देतेस नई.
३. भाऊ, सगळे सोंग करता येते; पण पैशांचे करता येत नाही.

पण इथे प्रत्येकाने एक गाेष्ट लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्ही तुमची आयडिया तुमच्या पेक्षा मोठया लोकांना सांगतात त्यावेळीस त्यांचाकडून विरोध हा तुमच्या काळजीपोटी जास्त असतो. बघा आपण काही मारवाडी, सिंधी नाही आहेत की घरचे लगेच मागे उभे राहतील. त्यामुळे मागे न सरकता अापल्या विचाराच्या पक्षाला बिनधास्तपणे यशाच्या अाकाशात झेप घेऊ द्यावी. मला असे बरेच जण भेटतात कि, बिझनेस आयडिया आहे; पण सुरवात कुठून करू. त्यासाठी पुढील काही गाेष्टी लक्षात ठेवा.

१. आधी कुठे जाऊन अनुभव घेऊ कि कोणते कोर्स करू?
२. लहानपासून सुरवात करू कि रिस्क घेऊन मोठाच बिझनेस करू.
३. पार्टनरशिप योग्य असते का ?
४. मला प्रोडक्शन करता येईल; पण विकता नाही येणार.
या नकारार्थी विचारााच्या गर्दीमध्ये एक महत्वाची गाेष्ट लक्षात ठेवा की, आपण बडगुजर आहोत त्यामुळे अापल्याला “चांगल्या प्रकारे बोलता येणे हे आपल्या डीएनएमधेच आहे. त्यामुळे टेंशन घ्यायचे नाही. माेठ्या हिमंतीने अापल्या विचाराचे पाऊल यशाच्या दिशेने टाकावे. समाजबांधवानाे हाे, असे बरेच प्रश्न अाहे. वरील पॉईंट्सवर् मी थोडं खोलात बोलेल कधी तरी…
ज्यांना बिझनेस करायचा’ आहे त्यांना माझं थोडं सांगणे आहे.

१. बिझनेसर करताना कधीच नकारात्मक विचार करू नका.
२. ज्यांनी कधीच बिझनेस नाही केला त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवता येणार नाहीत.
३. कोणत्याच गोष्टींमध्ये अडकू नका,कि नाण्याला दोन बाजू असतात etc ….
But your risk should be calculated.
४. तुम्हाला माणसे’जोडता आली पाहिजेत , टीम वर्क आले पाहिजे.

हा विषय अपूर्ण आहे. त्यामुळे पुढच्या भागात पुन्हा याविषयी सविस्तर मंथन करु या. तसेच वृत्त मालिका कशी वाटली हे देखील मला माझ्या व्हाॅटसअॅप नंबरवर जरुर कळवा.

मित्रांनो यावर आपण सविस्तर चर्चा करू शकतो. या लेखा विषयी आपले प्रश्न आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये टाकावे. आपणांस लेखकाकडून योग्य मार्गदर्शन करण्यात येईल व ही चर्चा समाजबांधवाना सुध्दा प्रेरणादायी ठरेल. म्हणून या लेखा विषयी किंवा मालिके विषयी आपले मत कमेंट्स व्दारे नक्की कळवा. धन्यवाद

शैलेश बडगुजर, माेबाईल नंबर : 9890721281 मेनेजिंग डायरेक्टर, गंगा डेअरी आणि अग्रोप्रोडक्टस्

6 Comments

  1. Good evening,.

    I am Badgujar Chetan from Maharashtra Dist Dhule Shirpur,..

    Subject:
    Regarding to new opportunities in Agricultural, Technical, Economic etc and skills set,,.

    Good afternoon ,.

    I had been searching a good opportunity regarding to the business ,but no opportunity is available in current situation,.
    So,if yous has any opportunity regarding to any new upcoming business kindly reply me.

    Thanks.
    Badgujar Chetan B..

    • Hi chetan,
      It seems you are looking for an opportunity in the market. You can work on your skills set or if you have strong education background you can start your own business.
      Follow the next part of this series may be you will get the answers.

  2. व्यवसाय मार्गदर्शन उत्तम साधर केले अभिनंदन प्राऊड बडगुजर ग्रुप व आखील भारतीय युवा ग्रुप यांनी पुढाकार घेऊन मागे शैक्षणिक वेब मीनार प्रमाणे उघ्योजक घडविण्यासाठी वेब मीनार अँरेज करावा धन्यवाद

  3. Hellow Sir,

    Good Evening!!!

    I’m vaishali Chavan Badgujar from Rasayani Panvel.I have done MBA having good communication skills.Im also thinking for own business.Please suggest if you come across in idea.Please guide us.

    • Hi Vaishali,
      Thanks for your inputs, we all have to do business on the basis of our education, skillset, experience, and interest.
      on that basis only you can find out your way and definitely you will get this. it might be in your personal interest field. business is not a thing where someone can puh, suggest, or force anyone to do this. the idea has to come first from your side and together we can set the direction to achieve the goal.
      All the Best.
      Regards,
      Shailesh Badgujar
      Mob : 9890721281

Leave a Reply to Shailesh Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*