कोरोनाच्या मुक्ति साठी नाशिक येथील मा. श्री. सुधाकर भाऊ मैदानात – श्री. दिलीप रामकृष्ण बडगुजर, नाशिक

प्रभाग २५ मध्ये घरोघरी पाहणी, तपासणी व उपचार या त्रिसूत्री अभियानाची सुरुवात नगरसेवक सुधाकर बडगुजर व नगरसेविका हर्षा बडगुजर यांनी सोमवारी सुरवातीला बैठक घेऊन व नंतर आपल्या परिसरातील खाजगी डॉक्टरांच्या मदतीने तपासणी मोहीम सुरू केली. यामध्ये हजार ते दीड हजार नागरिकांची घरी जाऊन तपासणी करण्यात आली. यामध्ये ताप, ऑक्सिजन लेव्हल व गरज असेल तेथे प्रतिकार क्षमता वाढविण्याच्या गोळ्या देण्यात आल्या. यामध्ये विशेष बाब म्हणजे रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात सहा जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही मोहीम यशस्वी ठरत असल्याचे दिसून आले. या मोहिमे प्रसंगी डॉ. संदीप मंडलेचा, डॉ. अजय माळी, डॉ. त्रिवेंद्र शिंदे, डॉ. तुषार शिंदे, डॉ. गाजरे, डॉ. महाजन तसेच मनपा डॉ. दीपिका मोरे, अनुजा शेवाळे, डॉ. गायकवाड तसेच पंकज जाधव, पवन मटाले, हितेश शिरसाठ, सचिन पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमे बाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे सदर मोहीम पाटील नगर येथील प्रतिबंधित क्षेत्रातून करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची भीती दूर होण्यास मदत झाली. तर पहिल्या दिवशी या तपासणीमुळे कोरोना बाधित आढळून आले ही विशेष बाब ठरली. बडगुजर चामुंडा युवक मित्र मंडळ नाशिक तर्फे भाऊ व हर्षाताई खऱ्या अर्थाने करोना योध्दा आहे सलाम तुमच्या कार्याला सर्व टीमला

बातमी:- श्री. दिलीप रामकृष्ण बडगुजर.

3 Comments

  1. Kharach aashi personality samaj bhushan aahech. Pan mature politicians sudha we r proud.

Leave a Reply to Ramesh Mohakar Cancel reply

Your email address will not be published.


*