निखळलेला तारा – थोरला भाऊ दादा कै. विलास रघुनाथ बडगुजर – सौ. अलका काशिनाथ बडगुजर, वाडा

काळाचा महिमा काळच जाणे कठीण तुझे अचानक जाणे
आजही घुमतो तुझा स्वर कानी वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत दोन दिसांची नाती

एखादी व्यक्ती जन्माला येते ती अनेक गुणांचे पुंजके घेऊनच. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर त्यांचे विविध पैलू विखुरले जात असतात. अशीच एक विविध पैलूंनी आपले आयुष्य जगून गेलेली व्यक्ती म्हणजे माझा भाऊ कै. विलास रघुनाथशेठ बडगुजर उर्फ दादा . दादाचा जन्म धुळे जिल्ह्यातील. आई,वडील एक लहान भाऊ आणि चार बहिणी असा रघुवंशी कुळातला भला मोठा परिवार. दादा आम्हा भावंडामध्ये जेष्ठ . आमचे वडील पोलीस खात्यामध्ये शहादा येथे कामाला होते परंतु पुढे नोकरी मध्ये मन न लागल्याने आमचे वडील व्यवसायानिमित धुळे येथे स्थायिक झाले . घरची परिस्तिथी तशी बेताचीच होती. वडील शिस्तीने कडक व शिक्षण प्रिय असल्याने आम्हा भावंडाना सक्तीने शाळेत घातलेले होते.
पुढे हळू हळू काळ सरत असताना मोठ्या भावाची कुटुंबाची जबाबदारी म्हणून आमच्या दादाने आपल्या लहान काकांच्या मदतीने मुंबई गाठली व मुंबईत काकांच्या ओळखीने गोरेगाव येथील निर्लोन कंपनी मध्ये सुपरवायझर या पदावर नोकरी सुरु केली हे सर्व करत असताना आमच्या दादाला खूप कष्ट व हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या कारण कुणाच्या वशिल्याने काम झाले म्हणजे मान अपमान सहन करणे आलेच परंतु यातून सुद्धा दादाने मोठ्या हिमतीने व धैर्याने मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये कष्ट करून घाटकोपर येथे चाळीमध्ये स्वतःची खोली घेऊन जोड व्यवसाय फॅब्रीकेशनचा चालू केला.
कारण दादाची चिकाटी खूप होती. किती दिवस कुणाच्या हाताखाली राबायचे अशी त्याची धारणा होती .. ह्या गोष्टीचा संदर्भ देण्यामागचे कारण म्हणजे माझे पती श्री काशिनाथ रामदास बडगुजर कारण माझे यजमान हे सुरुवातीच्या काळात म्हणजे त्यांचे शिक्षणशास्त्राच्या पदवीचे शिक्षण घेताना आपल्या बहिणीचे यजमान व आपले पाहुणे या नात्याने मुंबईत शालक-आणि पाहुणे एकत्र राहिलेलं होते त्यामुळे दादाच्या अश्या अचानक जाण्याने जास्त शल्य व दुःख त्यांना होते आहे कारण त्यांनी दादाबरोबर दादाचे खूप वाईट आणि चांगले दिवस त्यांनी पहिले होते.या सर्व घडामोडीमध्ये एका मोठ्या मुलाची व भावाची कर्तव्य म्हणून सगळे काही कौटुंबिक जबाबदारी आणि त्याचे सोपस्कार त्यांनी त्याच्या परीने केलेले होते बहिणींचे विवाह, धुळ्यातील स्वतःचे आई वडिलाकरिता बांधून दिलेले घर हि सर्वे कर्तव्य यथासांग पूर्ण केलेली होती व या सर्व गोष्टीचा तसेच अडलेल्या नडलेल्याना मदत करणे तसेच गरीब दीनदुबळ्यासाठी धर्म करणे यामुळे त्यांचा त्यांना आशीर्वाद मिळून दादांची आर्थिक परिस्तिथी चांगली राहून पुढे दादाने नवी मुंबई येथे स्वतःची आणखी एक फॅक्टरी चालू करून समाजातील तरुणांना आदर्श घालून दिलेला होता
तसेच दादाला असलेली मुलगी म्हणजे माझी भाची सौ.कांचन हिचे सुद्धा फागणे येथील सुसंस्कृत घराण्याशी संबंध जोडून विवाह केला , का कुणास ठाऊक दादाने केलेल्या चांगल्या कामाची फळ म्हणून त्याला जावई सुद्धा उच्च विद्या विभूषित मिळालेले होते.(श्री सुनीलशेठ सुरेशशेठ बडगुजर .मूळ गाव-फागणे ) हल्ली मुक्काम कोपरखैरणे नवी मुंबई ; त्यांची मुले म्हणजेच राहुल आणि राम (नातू) यांचे त्यांच्या आजोबावर खूप प्रेम होते .आमचा दादा नेहमी त्याच्या नातवंडांचे कौतुक करत असायचा.


या सर्व संसाराच्या गाड्यामध्ये दादाने बडगुजर समाजा मध्ये एक चांगले उद्योजक म्हणून सुद्धा नावलौकिक मिळवलेला होता त्याच प्रमाणे दादा समाजकार्यात नेहमी सक्रिय राहायचा देणगी असो व अन्य कुठलीही कामे करण्यात तो कधीही मागे हटायचा नाही कारण त्याचे नेहमी एक वाक्य असायचे कि आपल्याला मिळालेल्या यशामध्ये जसा सगळ्यांचा हातभार आहे तसेच आपण सुद्धा आपल्या समाजाचे काही देणे लागतो मग ते कुठल्याही स्वरूपात असो. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर त्याला धार्मिक कामाबद्दल जास्त ओढ असायची यासाठी धुळे येथील आमच्या हरी ओम कॉलनी येथे असलेल्या घरासमोरच्या महादेव मंदिराच्या बांधकामाकरिता त्याने यथासांग मदत केलेली होती त्याचीच परतफेड म्हणून किंवा त्याचा असा सामाजिक कामाबद्दल चा हेका म्हणून तेथील आजूबाजूच्या स्थानिक जेष्ठ व कनिष्ट नागरिकांनी मिळून त्याचा कृतज्ञता सोहळा केलेला होता
परंतु दादाच्या अश्या आकस्मिक निधनाची बातमी कळल्यानंतर सगाळ्यांनाच एक धक्का बसला कि आपल्या जवळचा अधिकाराचा व दानशूर वेळोवेळी आर्थिक म्हणा किंवा शारीरिक म्हणा मदत करणारा माणूस आपल्यातून गेला हे मनाला पटत नव्हते दादाच्या अश्या जाण्याने पोकळी भरून निघणार नाही दादांची एकंदरीत जीवनशैली आणि त्याच्या जीवन प्रवास पाहता त्याने खूप कष्ट केले होते आणि त्याला मिळालेल्या थोर मोठ्यांचा आशीर्वाद या मुळेच दादा आयुष्यात नेहमीच यशस्वी झालेला होता मध्यतंरी त्याने परदेश गमन सुद्धा केलेले होते.
दादा कायम आपल्या सगळ्यांच्या आठवणीत व स्मृतीत राहील विशेषतः आम्हा बहीण भावंडांसाठी त्याने खूप काही केलेले होते.. साधी राहणी व उच्च विचारसरणी असा आमचा दादा होता . त्यांच्या परिचयात जो येईल त्याचे दादा मन जिंकून घ्यायचा .कंपनीत, गावात, शहरात आसपास त्यांनी अनेक माणसे जोडली होती . येणार्‍या जाणार्‍याला नमस्कार करून त्यांची विचारपूस करणे हा स्वभाव समोरच्या व्यक्तीच्या मनात दादा करिता आपुलकी निर्माण करायचा. जमेल तितकी मदत समोरच्या व्यक्तीला करणे ह्या स्वभावामुळे त्यांचा सगळ्यांनाच आधार वाटायचा.
परंतु अल्पशा आजाराने दादा १८ जुलै २०२० रोजी ईश्वरप्रिय झाले आणि कुटुंब मित्रपरिवारावर शोककळा पसरली. दादा गेले तेव्हा त्यांचे वय ६९ होते पण त्यांची उमेद ३०-४० च्या व्यक्तीसारखी होती त्यामुळे इतका उत्साही, उमेदी माणसाला झटकन देवाज्ञा झाली ह्यावर विश्वास ठेवण आम्हाला व परिचितांना कठीण जात आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना व श्रद्धांजली.

‘’ भावाचं निरागस ‘प्रेम’
अन बहिणीची अफाट ‘माया’
हे सर्वांच्या भाग्योदयी नसतं.
अन म्हणूनच मनाला
एक आस लागून राहते . कायम ‘’……

ज्योत अनंतात विलीन झाली स्मृती आठवणींना दाटुनी आली
भाव सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही श्रद्धांजली

शोकाकुल :
श्री. काशिनाथ रामदास शेठ बडगुजर (पाहुणे) व सौ.अलका काशिनाथ शेठ बडगुजर (बहीण)
समस्त भिलमाळ आणि रघुवंशी परिवार
वाडा जिल्हा -पालघर

5 Comments

  1. कै विलास दादांना विनम्र श्रद्धांजली.
    रवींद्र कोतवाल व परिवार आपल्या दुःखात सहभागी आहेत.

  2. जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला अश्रुपुर्ण श्रध्दांजली ??

  3. कै. विलास शेठ यांना श्रध्दांजली.
    खुप छान लेख, मनाला हेलवून टाकणारा.

  4. Please accept my deepest condolences and heartfelt sympathies to you upon the passing of dearest Vilas Badgujar.

Leave a Reply to Dr Jatin Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*