आज संपुर्ण जगात कोरोना ची महामारी सुरू आहे. तसाच याला अपवाद आपला भारत देश सुद्धा राहिला नाही, अमेरिका, ब्राझिल नंतर आज सर्वात जास्त कोरोना चे रुग्ण असतील तर ते भारतात आहेत.
तसच आज आपल्या समाजात पण भरपूर ठिकाणी कोरोना चे रुग्ण आढळले आहेत, काही दगावले काहीचे उपचार सुरू आहेत तर काहींनी ह्यावर मात केली आहे, तर काहींनी चक्क कोरोना ला हरवलं आहे. तर आज आपण आजच्या लेखात अश्याच एक संघर्षमय व्यक्तीची कोरोना सोबत कशे लढले त्याला कसं हरवलं हे बघणार आहोत..
श्री. भगवान कौतिक बडगुजर, (६१) रा. शिरपुर, जि. धुळे महा. यांनी आपल्या शब्दात मांडलेली एक संघर्षमय कोरोना सोबत कसे लढले आणि कोरोनो ला कसं हरवलं. दि.९ जुन २०२० ला मला थोडा खोकला यायला सुरवात झाली थोडा ताप पण आला मी लगेच घरच्यांना सांगितले की मला असं होत आहे त्यांनी लगेच स्वतःला डॉक्टर च्या सांगण्यानुसार एक दिवस स्वतःला घरातच Isolate केले, परिवाराला मी स्वतः पासून दूर राहायला सांगितले, त्यांना Social Distuncing माझ्या पासून ठेवायला लावली परिवारात माझी पत्नी, २ मुले ,१ सून व २ नातवण्डे असा परिवार आहे. एक दिवस नंतर लगेच मी माझी चाचणी करण्यासाठी शिरपुर सिव्हिल हॉस्पिटल ला गेलो, माझे ताप व ऑक्सिजन चेक केलं त्यानुसार कोरोनो चे काही लक्षणे माझ्या मध्ये दिसायला लागले लगेच तातडीने डॉक्टरच्या सांगण्यानुसार मला धुळे ह्या गावी हिरे मेडिकल हॉस्पिटल धुळे, ला हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली. लगेच माझ्या सोबत माझा मोठा मुलगा व लहान मुलगा हे Social Distuncing ठेवून माझ्या सोबतच होते त्यांनी लगेच १०८ तात्काल सेवा देणारी Ambulance ला कॉल केला लगेच Ambulance मध्ये बसुन मला धुळे ला नेण्यात आले,
(Ambulance मध्ये बसण्या अगोदर मला माझ्या परिवाराने एकच हिम्मत दिली आणि सांगितले की (आण्णा) आपल्याला कोरोना याला हरवायचे आहे.. मी हा शब्द धरून Ambulance मध्ये बसलो)
मला तिथे लगेच Isolation वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले, त्याच दिवशी दि.१० जुन २०२० ला माझे कोरोनो चाचणी घेण्यात आली, माझी चाचणी घेवून माझा नमुना लॅब ला पाठवण्यात आला. माझा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होता तर. मी माझ्या परिवाराला कॉल केला व तिथली सर्व परिस्थिती कशी आहे सर्व संभाषण करून सांगितले , माझ्या परिवाराने खूप प्रोत्साहन दिले, त्यांनी मला ऊर्जा येईल असे माझ्याशी बोलत राहिले दुसऱ्या दिवशी रात्री माझा रिपोर्ट येणार होता. तिकडे माझा परीवार घरी माझ्या रिपोर्ट ची वाट बघत होते . आणि मी घाबरून गेलो होतो की आपला रिपोर्ट काय येणार अस. पण मी खचलो नाही मला माहित होत की माझा रिपोर्ट काय येणार आहे.. मला इथे त्रास पण व्ह्यायला लागला होता. माझ्या घश्यात खूप त्रास होत होता, मला श्वास घ्यायला पण त्रास होत होता.. रात्रीचे ९ ते १० च्या दरम्यान माझा रिपोर्ट Positive आला. मला त्या वेळेस खूप त्रास होत होता. मी धीर नाही सोडणार मी हे माझ्या परिवाराला प्रॉमिस केलेलं होत. मला माहित नव्हतं तो पर्यंत की माझा रिपोर्ट आला आहे. अस मला लगेच Isolation वॉर्ड मधून ICU वॉर्ड मध्ये घेवून गेले. मला त्या वेळेस काहीच सुधरत नव्हतं मला खुप त्रास होत होता. मला व्हेंटिलटरवर ठेवण्यात आले लगेच, माझ्या परिवाराला मी सांगितले की मला खूप त्रास होत आहे मी राहील की नाही मला नाही माहित. पण परिवारातील माझी पत्नी माझे दोन्ही मुले माझी सून ह्यांनी मला समजावलं की तुम्ही धीर नका सोडू हा कोरोना काही करू शकणार नाही तुम्हाला, तुम्हाला त्याला हरवायचे आहे फक्त हा त्रास सहन करून घ्या बाकी तुम्हाला काही होणार नाही.
जेव्हा मला माहीत पडले की आता मला व्हेंटिलेटर लावणार आहेत, तेव्हा मी माझ्या जावयाने (श्री. ललित रामकृष्णशेठ बडगुजर, दुबई) यांनी पहिल्या दिवशी एक गोष्ट सांगितलेली आठवली की , जेव्हा आपल्याला व्हेंटिलटर लावतात तेव्हा मुळात घाबरण्याची गरज नसते, तेव्हा आपण स्वतः ला व्हेंटिलटरवर जाण्याला Prepared राहायचं नेहमी, कारण व्हेंटिलटर ला आपल्याला आपला जीव द्यायचं नाही आहे, आपल्याला त्याच्याकडून आपला जीव वाचवून घ्यायचा आहे.!! म्हणून मी समाजबांधवांना एक संदेश देऊ इच्छितो की व्हेंटिलेटर लागल्यावर मुळात घाबरायच नाही, नेहमी Prepare राहायचं धाडशीने व्हेंटिलेटर ला सामोरं जायचं आणि या Covid ला मात द्यायची..
इथून माझी व कोरोना ची फाईट सुरू झाली, तिकडे मला माझ्या परिवाराची आठवण येत होती, व माझा जीव माझ्या दोन्ही नातवंडं मध्ये अडकला होता. परिवाराने मला पावला पावला वर धीर दिला ..

मी ती रात्र कशी तरी काढली आणि सकाळी मला थोड बरे वाटू लागले, मला धीर आला मी माझ्या परिवाराला संपर्क केला आणि सांगितले की मी आता बरा आहे माझी काळजी नका करू. माझे हॉस्पिटल मध्ये तातडीने उपचार सुरू झाले, मला डॉक्टर पण येवून सांगायचे की काका तुम्हाला कोरोना ला हरवायचे आहे कुठल्याही परस्थितीत. मी निश्चय केलेला होता आता. हरावयच कोरोना ला.. तिकडे माझा परीवार माझ्या पासून दुर होता, त्यांनी पण संपुर्ण माझ्या परीवार ने स्वतःला Quarantine घरातच करून घेतलं होत, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी सांगून दिले (माझ्या परिवार कडून) होते की तुम्ही स्वतःला Quarantine करून घ्या, व काही त्रास जाणवल्यास लगेच चाचणी करून घ्या कोरोना ची. माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेतल्या नंतर ते सर्व Negative रिपोर्ट आले होते..
त्यामुळे माझ्या मुले कोणाला काही कसला त्रास पण नव्हता झाला,
१० दिवस झाले माझे उपचार सुरूच होते.. तिथे डॉक्टर जे सांगायचे तस मी करायचो माझ्या कडे डॉक्टरानी चांगलं लक्ष ठेवलं होत, माझा त्रास थोडा वाढून गेला होता. मला काही दिवसानंतर अजुन त्रास व्हायला लागला होता मला श्वास घ्यायला खूपच त्रास होऊ लागला होता. पण डॉक्टराच्या प्रयत्नाने मी त्यांना तसा रिस्पॉन्स देत होतो माझी बॉडी त्यांना मदत करत होती उपचार दरम्यान. मी जेव्हा खचायचो तेव्हा मला परिवार कडून प्रोत्साहन करण्यात यायचं मी तसच ऐकायचो त्यांनी दुर राहून माझी , तसच माझी मुलगी दुबई ला असते माझ्या जावई नी पण खूप प्रोत्साहन केलं ते दुर होते पण मला अस वाटायचं की आता हे सर्व जवळ आहे..
माझा रोजचा रूटीन फिक्स झालं होतं सकाळी उठायच प्राणायाम करायचो, थोड राऊंड मारायचो डॉक्टर च्या सांगण्यानुसार. मी धिरे धीरे पुढे जात होतो, तसच कोरोनो ला हरवायचे होत हे माझ्या डोक्यात होत.
मला हॉस्पिटल ला येवून १५ दिवस झालेले होत मला अजुन पण श्वास घ्यायला व चालायला त्रास होत होता. जेवण जात नव्हतं मला औषधी घेत असल्या मुळे जेवण करू वाटत नव्हतं पण पुढे लढायच आहे ह्या विचाराने मी थोड का होईना जेवण करत होतो , डॉक्टर माझ्यावर सतत उपचार करत होते, कोविड सोबत माझी फाईट सुरूच होती, पण मी जिद्दीने लढत होतो. २० दिवस झाले तरी अजुन मी ICU वॉर्ड मध्येच Admit होतो, डॉक्टरांच्या मेहनतीने , देवाच्या कृपेने, माझ्या परिवाराने सतत प्रोत्साहनाने मी जिद्दीने लढत होतो..
२८ दिवसानंतर मला Covid वॉर्ड मधून जनरल वॉर्ड मध्ये स्थलांतर करण्यात आले मला व्हेंटिलटर ची गरज नाही लागत होती. मी आता नॉर्मल ऑक्सिजन ने ऑक्सिजन घेत होतो , माझ्या परिवाराला मी माहिती दिली, त्यांना बरे वाटले ते ऐकून कारण मी कोरोना ला हरवत होतो. आणि डॉक्टरांनी पण सांगितले होते काका तुम्हाला आता घरी जायचं आहे ना, तर बरे व्हा आता ..
२९ व्या दिवशी मला डॉक्टर येवून भेटले व सांगितले काका तुम्ही आता पूर्ण पणे बरे झाले आहे आम्ही तुम्हाला डिस्चार्ज करू लवकरच… हे ऐकून मी डॉक्टराचे खूप आभारी झालो ….
व ३० झाले म्हणजे १० जुलै २०२० ला मला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आले मला घ्यायला माझे दोन्ही मुले आलेले होते, त्यांनी मला पाहून खूप आनंदी झाले… व मी पण त्यांना पाहून खुप आनंदीं झालो.. व मला माझ्या गावी शिरपुर ला माझ्या घरी नेण्यात आले. मी आता सरकारी नियमानुसार डिस्चार्ज मिळाल्यानंतर १४ दिवस होम Quarantine राहील.
मला तिथे डॉक्टरांच्या रुपात देव भेटले. मी त्याचे खूप आभार करतो. माझे संपूर्ण परिवार माझी पत्नी, माझे दोन्ही मुले, माझी सुन व माझे दोन्ही लहान नातवंडं यांनी मला वेळ वेळी प्रोत्साहन दिले, माझ्या या Covid आजारांमध्ये मला जे मार्गदर्शन दिले त्यांचे मी आभार मानतो.
मी समाजबांधवाना एकच संदेश देऊ इच्छितो, की कोरोना काळात सकारत्मकता आणि आपली प्रबळ इच्छाशक्ती असावी. यावरून आपण कोरोनावर नक्कीच मात करू शकतो. कोरोना हा फार प्रमाणात पसरत आहे याला आपण फक्त आणि फक्त योग्य खबरदारी घेऊनच यापासून वाचू शकतो. मी जसे माझ्या परिवाराचे यापासून रक्षण केले, ते या सावधगिरी आणि दक्षते मुळेच. त्यामुळे सतर्क रहा काळजी घ्या, सरकारी नियमांचे पालन करा. घरीच रहा सुरक्षित रहा.
धन्यवाद.
कोरोना हारला मी जिंकलो – श्री. भगवान कौतिक बडगुजर, शिरपूर

शब्दांकन – श्री. दिनेश भगवान बडगुजर (शिरपुर)

Congratulations
श्री भगवांभाऊ आपले अनुभव सर्वांना प्रेरणादायी आहेत मन खंबीर सकारात्मकता प्रोत्साहन असले की अशक्य काहीही नाही
आपण कोरोनाला हरवल मनपूर्वक अभिनंदन समस्त नातलग परिवार मित्रवर्य यांचं प्रेम व आपली जिद्द याला तोड नाही परमेश्वराचे आपण ऋणी आहोत स्वस्थ रहा धन्यवाद!!!!
श्री.भगवानशेठ, नमस्कार
आपण करोनावर मात करुन सुखरुप आहात हे समजल्यावर मला व माझ्या परीवाराला खुप खुप आनंद झाला…. आपण व आपले कुटुंब खरोखरच धैर्याने या परीस्तीतीला सामोरे गेले यातून यशस्वी झाले, आपले व आपल्या परीवाराचे मनापासून खुप,खुप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा…..
We Are PROUD Of You Anna
श्री.भगवानशेठ, नमस्कार
आपण करोनावर मात करुन सुखरुप आहात हे समजल्यावर मला व माझ्या परीवाराला खुप खुप आनंद झाला…. आपण व आपले कुटुंब खरोखरच धैर्याने या परीस्तीतीला सामोरे गेले यातून यशस्वी झाले, आपले व आपल्या परीवाराचे मनापासून खुप,खुप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा…..