एसएसबीटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मुंबई यांचेमार्फत दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरचे ई- कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले होते.covid-19 हि फार्मसी क्षेत्रांत बदल घडवून आणण्यासाठी असलेली एक सुवर्णसंधी हा या कॉन्फरन्स चा विषय होता. दिनांक 27 व 28 जून 2020 या दोन दिवसात सदर ई-कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यात लातूर मुंबई औरंगाबाद शिरपूर अशा अनेक शहरांमधून केवळ आठ व्यक्तींची रिसोर्स पर्सन किंवा मार्गदर्शक प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या आठ व्यक्तींमध्ये बडगुजर समाजातील एस एस बी टी इंजीनियरिंग अँड तंत्रज्ञान महाविद्यालय बांभोरी येथे कार्यरत असलेल्या बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या सहाय्यक प्राध्यापिका सौ सारिका पवार यांची सुद्धा निवड राष्ट्रीय स्तरावरच्या कॉन्फरन्स मध्ये मार्गदर्शक म्हणून करण्यात आली होती. ही बाब बडगुजर समाजासाठी अभिमानाची अशी ठरली आहे.

श्री नंदलाल रामदास पवार भुसावळ एम एस ई बी मध्ये कार्यरत आहेत त्यांच्या प्रा.सौ सारिका पवार या स्नुषा असून रायसोनी कॉलेज जळगाव येथे एच् ओ डी म्हणून कार्यरत असलेले प्राध्यापक श्री शंतनू नंदलाल बडगुजर यांच्या धर्मपत्नी आहेत.

या ई-कॉन्फरन्समध्ये सौ सारिका पवार यांनी उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन करत सध्याच्या covid-19 या साथीच्या काळात शिक्षण क्षेत्रामध्ये कोणकोणते बदल अपेक्षित आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच covid-19 या आजारामुळे फार्मसी क्षेत्रांमधील ड्रग डिझाईन तसेच औषध निर्मिती व नियंत्रणाबाबत आणि नवनवीन व्हँक्सीन किंवा लस संशोधन करण्यासाठी कशा पद्धतीने एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे याचे उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केले. सदर कॉन्फरन्स मध्ये मार्गदर्शक म्हणून इतर सर्व सातही व्यक्ती या पीएचडी होल्डर होत्या तरीसुद्धा आठवी व्यक्ती म्हणून प्राध्यापिका सौ सारिका पवार यांची यात निवड होणे व राष्ट्रीय स्तरावर त्यांनी मार्गदर्शन करणे ही समाजासाठी निश्चितच अभिमानाची अशी बाब ठरली आहे. यासाठी समाजातील सर्व स्तरांमधून प्रा.सौ सारिका पवार यांचे अभिनंदन केले जात आहे. भविष्यकाळात सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने समाजाचा नाव लौकिक वाढवावा म्हणून त्यांना हार्दिक शुभेच्छा. तद्वतच अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
प्रा. सौ. सारिका बडगुजर यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या मेसेज खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊ शकता किंवा त्यांना प्रा. शंतनू पवार – 9689883298 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
शब्दांकन:- प्रा. मिलिंद बडगुजर जळगाव 94 21 18 44 95


Khup khup abhinandan Sarika uttarottar ashich pragati karavi hich sadichha
,
Congratulation madam
Heartiest Congratulations madam
Congratulations
Congratulations