एक उपक्रमशील ग्रंथपाल राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कु-हे पानाचे ता. भुसावळ. आदर्श ग्रंथपाल सुदर्शन यशवंत बडगुजर गेल्या वीस वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवित असतात.त्यात समाजातील नामांकित, विचारवंत ज्यांनी कठीण परिस्थितीत आपल जीवन उज्वल व यशस्वी केलं. अशा या लोकांना शाळेत पाचारण करुन विविध उपक्रम राबवित असतात. जेणेकरून विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळावी. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अंतर्गत सर्वांगीण विकास व्हावा. यादृष्टीने नेहमी धडपडत असतात. आदरणीय सुदर्शन बडगुजर एक उत्तम वाचक असून शाळेतील विद्यार्थी व शिक्षक तसेच गावातील जेष्ठ श्रेष्ठ यांना वाचनाची आवड निर्माण कशी होईल . त्यासाठी उत्तम वाचक प्रेरणा अंतर्गत विविध कृतिशील कार्यक्रम राबवीत असतात. विद्यार्थ्यांच सुंदर हस्ताक्षर सुधारावे याबद्दल सतत प्रयत्नशील असतात. 2008 सांली एकूण तीन विद्यार्थी टॅलेंट हंट परीक्षेत उत्तीर्ण होऊन राष्ट्रपती महामहीम प्रतिभाताई पाटील यांच्या दिल्ली भेटीला गेल्यामुळे राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. हा सन्मान म्हणजे पूर्ण गावाचा सन्मान ही बाब शाळेसाठी उल्लेखनीय आहे योग्य मार्गदर्शन व पुस्तके उपलब्ध करून आदर्श ग्रंथपाल सर विद्यार्थ्यांमध्ये रंगतात म्हणून यांच्या अथांग परिश्रमातून शाळेला एक नाव लौकिक यश मिळते. लॉक डाऊन काळात सुद्धा त्यांनी बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे गरजूंना धान्य वापटासाठी त्यांनी मदत केली होती. सर अर्धवेळ ग्रंथपाल असून सर्व कार्यक्रमाची जबाबदारी स्वखर्चाने परिपूर्ण सांभाळतात म्हणून सरांना उपक्रमशील अशी पदवी बहाल केली आहे. सरांचा स्वभाव मनमिळावू व होतकरू असल्याने शाळेत त्यांना मोलाचे स्थान आहे. शाळेतील अध्यक्ष मा. एकनाथरावजी बडगुजर, घनश्याम भाऊ बडगुजर, मुख्याध्यापक डी. डी. पाटील सर. पर्यवेक्षक गवळी सर.सर्व शिक्षकांकडून त्यांचे विशेष कौतुक केले जाते. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून पुस्तके उपलब्ध करणे आणि शिष्यवृत्ती परिक्षेसाठी मार्गदर्शन करणे सरांना खुप आवडते. सरांच्या मार्गदर्शनाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली आहे. अशा या उपक्रमशील ग्रंथपाल श्री. सुदर्शन बडगुजर सर यांना युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपचा सलाम आणि यापुढेही असेच कार्य आपल्या हातून घडत राहो ही शुभेच्छा. धन्यवाद.

Leave a Reply