श्री. रविंद्र रघुनाथ बडगुजर राहणार उंदीरखेडे ह. मु. पिंप्री खुर्द यांचा मुलगा कु.विनय रविंद्र बडगुजर याची नवोदय विद्यालय साठी निवड
पिंप्री खु.येथील आदर्श प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विनय रविंद्र बडगुजर याची नवोदय विद्यालयासाठी निवड करण्यात आली आहे. जानेवारी २०२० मध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात आदर्श प्राथमिक शाळा, पिंप्री खुर्द येथील विनय बडगुजर. या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
कु.विनय रविंद्र बडगुजर हा श्री. रविंद्र रघुनाथ बडगुजर राहणार उंदीरखेडे ह. मु. पिंप्री खुर्द यांचा मुलगा आहे. त्याला केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेसाठी शिक्षकवर्ग आणि कु. विनय च्या आई वडिलांचे मार्गदर्शन लाभले. त्याची नवोदय विद्यालय साठी निवड झाल्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.


विनय तुझं व आई वडिलांचं अभिनंदन.तुझ्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा.