आई चामुंडा माता ट्रस्ट सोनशेलू तर्फे प्रशासनाच्या पुढील मार्गदर्शक आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद – श्री. भाईदास रुपचंद बडगुजर, सोनशेलू

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आई चामुंडा माता ट्रस्ट सोनशेलू तर्फे मंदिर दर्शनासाठी बंद होते व आहे
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील काही गावात कोरोनाबाधित व संशयितांची संख्या वाढत असल्याने सोनशेलू येथील कुलदैवत आई चामुंडा माता मंदिर ट्रस्टच्या पदाधिकारी यांनी प्रशासनाच्या पुढील मार्गदर्शक आदेश येत नाही तोपर्यंत मंदिर बंद राहणार असून समाजबांधव यांना पुनःश्च सूचित करीत आहोत की शिंदखेडा ग्रामीण भागात रुग्ण आढळत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गावकरी व आई चामुंडा माता मंदिर ट्रस्ट तर्फे समाज बांधवांना कळविण्यात येतेकी कोणीही दर्शनासाठी येऊ नये परंतु काही समाज बांधव गुजरात मुंबई नाशिक सह इतर ठिकाणा वरून दर्शनाला येत असून मंदिर उघडून दर्शन करू द्यावे अशी विनवणी करतात त्यामुळे ग्रामस्थांन मध्ये घबराट निर्माण होते असून त्या समाज बांधवांन कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो तरी कोरोनाचे संकट जात नाही तसेच प्रशासन जाहीर करत नाही तो पर्यंत मंदिर बंद राहील तरी कोणीही दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन आई चामुंडा माता मंदिर ट्रस्ट व सोनशेलू ग्रामस्थांन कडून करण्यात येत आहे.

समाजबांधवाना कळकळीची विनंती आहे ही कोरोना महामारीमुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आपण सुरक्षित तर देश सुरक्षित. आपल्या सुरक्षिततेसाठीच शासकीय नियमानुसार सक्तपणे मंदीर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. तरी भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये. शासनाच्या पुढील आदेश आल्यानंतर ट्रस्ट तर्फे तसे आवाहन करण्यात येईल. सर्वांनी याची दखल घ्यावी आणि सहकार्य करावे ही विनंती.

चामुंडा माता ट्रस्ट, सोनशेलू, ता. शिंदखेडा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*