BUS FOR US FOUNDATION तर्फे श्री.अनिल भास्कर बडगुजर यांना कोविड योध्दा सन्मान पत्र – श्री. शुभम भगवान बडगुजर, धुळे

मुळगांव मुडी मांडळ ह. मु.नाशिक येथील श्री.अनिल भास्कर बडगुजर, रा. प. चालक,बोईसर आगार यांना BUS FOR US FOUNDATION तर्फे कोविड योध्दा सन्मान पत्र देण्यात आले. कोरोना सारख्या भयंकर महामारीशी आज संपूर्ण देश लढत आहे. अशा कठीण काळात आपण स्वतः च्या जीवाची पर्वा न करता सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून समाजासाठी करीत असलेले सेवाकार्य अतुलनीय आहे. लॉकडाऊन च्या काळात सुध्दा अवितरीत पणे आपले कार्य सुरू ठेवले. त्याबद्दल बोईसर आगारा तर्फे सुध्दा त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

श्री.अनिल बडगुजर यांचा समस्त मुडी, नंदुरबार, धुळे, अमळनेर, ओझर, नाशिककर परिवार या सर्वांना आपला अभिमान आहे. आपल्या या समाजकार्याबद्दल बस फॉर अस फाउंडेशन तर्फे मिळालेल्या कोविड योद्धा म्हणून मिळालेल्या सन्मानाबद्दल आपले अभिनंदन करतो. यापुढे आपण आपली जबाबदारी यथायोग्य पणे पार पाडाल आणि समाजाचे नांव उज्ज्वल कराल. आपणांस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छूक :

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*