शिरपूर येथील श्री. विलासराव दंगल बडगुजर, (व्हि. डी. बडगुजर सर) सेवानिवृत्त – श्री. प्रणव कोठवाल सर, फागणे

शिरपूर येथील श्री. व्हि. डी. बडगुजर सर हे दि.३१ मे२०२० रोजी कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय करवंद ता. शिरपूर विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब श्री.विलासराव दंगल बडगुजर आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर शासन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. शिरपूर तालुका आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. विलासराव बडगुजर सर आपल्या अभ्यासू, मनमिळाऊ स्वभावामुळे केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर आपल्या मित्र परिवारात, नातेवाईकात, तसेच विद्यार्थी जगतात लोकप्रिय आहेत.

शिरपूर तालुका आदर्श क्रिडा पुरस्कार स्विकारतांना श्री. व्हि. डी. बडगुजर सर

आज आपण श्री. व्हि. डी. बडगुजर सर यांचे विषयी थोडे जाणून घेऊया. श्री. व्हि. डी. बडगुजर सर यांचे मुळगांव मांडळ ता. अमळनेर असून सध्या ते शिरपूर येथे वास्तव्यास आहेत. मांडळ येथील प्रगतशील शेतकरी कै. दंगल शामराव बडगुजर, यांचे जेष्ठ सुपुत्र आहेत. सरांचा जन्म हा २३ मे १९६२ साली बोराडी येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा येथे झाले व इ. १० वी पर्यंतचे शिक्षण पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, बोराडी येथे पुर्ण केले. शिक्षण घेत असतांना त्यांचे मामा कै. जगन्नाथ शंकर बडगुजर, बोराडी यांचे मार्गदर्शन मिळाले. मामांकडे राहून त्यांनी माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण आणि बी. एस्. सी. चे शिक्षण एस्. पी. डी. एम्. कॉलेज, शिरपूर येथून पुर्ण केले तर व्यावसायिक शिक्षण बी. एड. (फिजिकल) बोराडी कॉलेज येथून पूर्ण केले. सर, अतिशय हुशार विद्यार्थी होते व त्यांना शिक्षणाची नितांत आवड आहे. त्यांनी तीच आवड कायम ठेवून वयाच्या ५२ व्या वर्षी एम्. एस्. सी. ची डिग्री मुक्त विद्यापीठ नाशिक येथून प्राप्त केली.

सरांनी आपल्या शैक्षणिक सेवेची सुरुवात १९८७ साली कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालय, अर्थे तालुका शिरपूर येथे माध्यमिक शिक्षक म्हणून झाली. सर हे विद्यार्थ्यांचे तसेच शाळेतील सहकारी शिक्षकवर्गा मध्ये सर्वांच्या आवडीचे होते. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे तसेच त्यांची शिकवण्याची शैली विद्यार्थ्यांना फारच आवडत असे.

त्यांच्या कार्यकुशल कामगिरी मुळे सरांना वेळोवेळी पदोन्नती मिळाली.

2016 साली पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती करण्यात आली. पर्यवेक्षक म्हणून सरांनी शंकर पांडू माळी विद्यालय, वरवाडे तालुका शिरपूर येथे 2018 पर्यंत कामकाज अतिशय प्रामाणिक पण पाहिले. त्यानंतर सरांची शिरपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात उपमुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय, करवंद ता. शिरपूर येथे पदोन्नती झाली. पदोन्नती सोबतच सरांना शिरपूर तालुका अंतर्गत आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सुध्दा सन्मानित करण्यात आले.

सरांनी आपल्या सेवेत बरेचसे उतार-चढाव पाहिलेत. सर नेहमीच आपल्या कार्यकुशलतेने व आपल्या प्रामाणिक सेवा भावामुळे विद्यार्थी वर्गात तसेच शाळेच्या स्टॉफ मध्ये सर्वांचे आवडते होते. सरांनी एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडली. व दि. ३१ मे २०२० रोजी वयाच्या ५८व्या वर्षी सेवानिवृत्ती झालेत.

सरांनी एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी अगदी प्रामाणिक पणे आणि निस्वार्थीपणे पार पाडली. तशीच कौटुंबिक जीवनातील जबाबदारी सुध्दा यथायोग्य पार पाडली. सरांच्या विवाहित जीवनाची सुरुवात नोकरी लागल्यानंतर १९८८ मध्ये झाली. आईचा आशीर्वाद आणि भावंडांचे प्रेम असा सुखी कुटुंब परिवार. दोन्ही बंधू शिक्षित आहेत. श्री. विश्वासराव दंगल बडगुजर, हे बी. ए. ग्रुज्युएट त्यांच्या पत्नी सौ. योगिता विश्वासराव बडगुजर बीए पास असून गृहिणी आहेत. असून श्री. विश्वासराव हे शिरपूर येथे शुगर फॅक्टरीमध्ये नोकरीस आहेत. तर लहान बंधू हे श्री. डॉक्टर मुकेश नंदवे हे पी. एच्. डी प्राप्त केली आहे आणि दिल्ली येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी सौ. दिपाली नंदवे ह्या एम्. डी आयुर्वेद, मुंबई येथून केले आहे. सध्या दोघेही दिल्ली येथे नोकरी निमित्त वास्तव्यास आहेत.

मोठा मुलगा सागर याच्या लग्नातील सहपरिवार फोटो

सरांना ३ मुले आहेत आणि तिघांनाही सरांनी योग्य शिक्षण व मार्गदर्शन दिले व आज ते आपल्या जिवनात यशस्वी वाटचाल करीत आहेत. मोठा मुलगा सागर याने एम. टेक केले असून बेंगलोर येथे एका नामांकित कंपनी मध्ये नोकरी करीत आहे. सागर यांचे लग्न बोदवड येथील प्रगतशील शेतकरी श्री. संजय जनार्दन बडगुजर यांची मुलगी सौ. ऋतुजा हिचेशी गेल्यावर्षी झाला. सौ. ऋतुजा सागर बडगुजर शिक्षण (BE CDAC Bangalore ) शिक्षण झाले असून बेंगलोर येथे नोकरी करीत आहेत. व्दितीय चिरंजीव श्री. राकेश ने B. E. (Computer), M.S. in Texas USA येथे शिक्षण घेतले असून सध्या ते अमेरिकेतील Texas येथे नोकरीस आहेत. त्यांचा विवाह नुकताच ठरला असून मुळगांव वर्शी ह.मु. पलूस, ता. सांगली येथील शिक्षक श्री. दिनेश मच्छिंद्र बडगुजर यांची जेष्ठ सुकन्या सौ. योगेश्वरी हिचेशी ठरला आहे. सौ. योगेश्वरी राकेश बडगुजर शिक्षण (BE Mechanical) पर्यंत शिक्षण झाले असून त्या पुणे येथे नोकरी करीत आहेत. तर लहान चिरंजीव दिपेश हा पुणे येथे बी. ई. च्या शेवटच्या वर्षांचे शिक्षण घेत आहे.

परिवारा सोबत आनंदायी क्षण सहपरिवार फोटो

सरांना या सर्व जीवन प्रवासात त्यांची सहचारणी सौ. अनिता विलासराव बडगुजर यांचे अनमोल साथ लाभली व या सर्व जबाबदाऱ्या सरांनी यथायोग्य पणे पार पाडल्यात. सौ. अनिता विलासराव बडगुजर (B.A. BEd) शिक्षण घेतले असून त्या शिरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. साहेबराव सोनू बडगुजर यांची जेष्ठ सुकन्या आहे. सौ. अनिता ताईंच्या साथीने अतिशय सुंदर आणि सुखी संसारवेल फुलवली. सुखी समृद्ध आणि सुशिक्षित असा परिवार आहे. सरांनी आपल्या शिक्षणाची आवड आपल्या विद्यार्थ्यांना तर दिलीच पण आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याला सुद्धा दिली तसेच सुनांना सुद्धा देत आहेत.

तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करीत असतात. सरस्वती मिशन तर्फे रचना हॉल धुळे येथे सन 2019 मध्ये घेण्यात आलेल्या त्रिराज्यस्तरीय बडगुजर समाज गुणगौरव सोहळ्यास इयत्ता दहावी व बारावी प्रथम आलेले विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून सरांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी व त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून समाजाप्रती बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना 5000 रुपयाची देणगी सदर कार्यक्रमास देऊ केली होती. तसेच सामाजिक कार्यात शक्य ती मदत आणि सहकार्य ते करीत असतात.

अशा एक उपक्रमशील विज्ञान शिक्षक, सदाबहार व्यक्तिमत्त्व, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या श्री. विलासराव बडगुजर सरांना विविध स्तरातून शुभेच्छा संदेश प्राप्त झाले आहेत.त्यांच्या सेवानिवृत्तीदिनी त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो व त्यांच्या हातून खूप समाजकार्य घडोत ही मन:पूर्वक शुभेच्छा!???????

श्री. व्हि. डी. बडगुजर सरांनी भावी आयुष्यासाठी अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप कडून आरोग्यदायी, आनंददायी शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*