आज माझ्या वडीलांचा ८ वा पुण्यस्मरण दिन आहे… मी त्यांना स्मरण करून विनम्र अभिवादन करतो…
बन दिपक जल अंधेरे मे, जो मुझे रोशनी देता था। एक फरिश्ता ऐसा मैने, अपने पिता के रुप मे देखा है।
? माझे पप्पा ?
आईची आठवण येते नेहमी आपोआप
पण लक्षात न आला, प्रेम करणारा बाप.
आईची माया कळते
लहानपणापासून स्पष्ट
पण कळत नाही तेव्हा
बाबा किती करत असतात कष्ट
आई ची माया अफाट अथांग
बाबांच्या प्रेमाचे केले न मोजमाप
लक्षात न आला, प्रेम करणारा बाप.
काही चूक झाली तर
आई घेई उराशी ।
बाबांना सांगताना
भीती वाटे जराशी
आई पुढे सारे मान्य
बाबा पुढे मात्र मारे थाप।
लक्षात न आला, प्रेम करणारा बाप…
आयुष्य खपवले त्यांनी
आमच्या आयुष्यसाठी
सावरणाच्या हाती आली
आता तोल सावरणारी काठी
आई ची उचक्की हि समजते रे
पण कळली नाही बाबांना कधी लाभली धाप
लक्षात न आला, प्रेम करणारा बाप…
आयुष्यभर झिजून
आज ती ज्योत गेली विझून
आज हि त्यांच्या आठवणीने
डोळे येतात भिजून
काही चुकले असेल तर
पप्पा करा मला माफ
आता फ़क्त लक्ष्यातच राहीलाय
तो प्रेम करणारा बाप
तो प्रेम करणारा बाप
- लोकेश रविंद्र कोतवाल आणि परिवार


छान आहे कविता
? !! विनम्र अभिवादन !! ?
कै.रविंद्र रामदास कोतवाल यांच्या आठव्या पुण्यस्मरण
दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
खुप छान आहे कविता.