शहादा येथील श्री. रविंद्र मोहन बडगुजर यांना शहादा पोलीस विभागातर्फे “कोरोना वॉरीयर्स सन्मान” – श्री. दिनेश बडगुजर, पारोळा

“कोरोना वॉरीयर्स सन्मान…”

      निस्वार्थीपणे केलेल्या कोणत्याही कामाची दखल आज ना उद्या कधीतरी परमेश्वराकडून घेतलीच जाते. याचा नुकताच प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आला. 

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर घोडलेपाडा ता. शहादा, जि. नंदुरबार येथे जि. प. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांना या आजाराविषयी माहिती, त्याची लक्षणे, याविषयी घ्यावयाची काळजी याबद्दल वारंवार माहिती दिली जात आहे. दि. 15/05/2020 रोजी पुन्हा याविषयीची माहिती विशेषकरून मनरेगा अंतर्गत काम करणारे कामगार यांना देण्यात आली. सामाजिक अंतर याचे महत्त्व समजवण्यात आले. तसेच मनरेगाच्या कामात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा याबद्दल शिक्षकांकडून सांगण्यात आले.

      याच दिवशी कोरोनाच्या काळात जनतेच्या सेवेसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री पुंडलीक सपकाळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व मनरेगा कामगार यांना शाळेतर्फे मास्क व  सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी कार्यक्रमात  शिक्षकांकडून सर्व पोलीस कर्मचारी व पोलीस विभागाचा पुंडलिक सपकाळे साहेबां सारखा एखादा मोठा अधिकारी जनतेच्या सुरक्षिततेसाठी काय धावपळ करत आहे याबद्दलची माहिती देत लोकांमध्ये जनजागृती केली होती. त्या कार्यक्रमाबद्दल चे काही फोटो व माहिती व्हाट्सअप च्या माध्यमातून केंद्रप्रमुख भैय्यासाहेब मोहन बिसनरिया यांच्यामार्फत साहेबां पर्यंत पोहोचली होती.

      मा. पुंडलिक सपकाळे साहेबांचा व माझा, आम्हा शिक्षकांचा व घोडलेपाडा गावकऱ्यांचा क्रिडा स्पर्धा मधील बक्षीस वितरण प्रसंगामुळे अल्प परिचय, अल्प संबंध होता. परंतु काही व्यक्ती निसर्गदत्त अश्या असतात की लागलीच आपली छाप सोडून जातात. त्यातलेच अविस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणजे पुंडलिक सपकाळे साहेब.

      दि. 23/05/2020 रोजी दुपारी 4:30 अचानक मा. केंद्रप्रमुख श्री भैय्यासाहेब मोहनजी बिसनरीया साहेब व सपकाळे साहेबांचे लहान बंधु श्री चंद्रकांत सपकाळे सर यांचे लागोपाठ फोन येतात व सांगण्यात येते की, सर तुम्हाला सायंकाळी ठिक 5:30 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बोलविण्यात आले आहे. पुंडलिक सपकाळे साहेब वेळेचे तंतोतंत पालन करतात तरी आपण वेळेवर हजर रहावे असे सांगण्यात आले. वेळेवर जातांना मी सोबत श्री निलेश भागवत सरांना घेऊन गेलो.

      जाताच सपकाळे साहेबांनी शब्दसुमनांनी स्वागत केले व वेळेवर आल्याने कौतुक केले. तिथे पोहोचल्यावर असे लक्षात आले की अजुनही काही शिक्षक व इतर मंडळीही तेथे उपस्थित होते. साहेबांनी लागलीच स्वतः कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सांगितले की आपण सर्व कोरोना वॉरीयर्स आहात. आपण स्वंयप्रेरणेने कुणी स्वतः मोफत मास्क वितरण करणे, गरजू लोकांना जीवनावश्यक धान्यादी मालाचे मोफत किट उपलब्ध करून देणे, कोरोना आजाराविषयी निस्वार्थपणे जनजागृती करण्याचे कार्य करून आपले सामाजिक उत्तरदायीत्व करत प्रशाशनासही सहकार्य केले आहे. 

त्यासाठी माझ्या कार्यालयाकडून आपण केलेल्या कार्याची दखल घेण्यात आलेली आहे. त्याबद्दल दिले जाणारे सन्मानपत्र आपण स्विकारावे व आमच्या सोबत चहा घ्यावा. आपण निस्वार्थीपणे केलेल्या सामाजिक कार्याला अधिक गती मिळावी यासाठी कुणालाही आधी न कळवता अचानक या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे साहेबांनी स्पष्ट केले. साहेबांनी सर्वांना स्वहस्ते सन्मानपत्र प्रदान केले. सन्मानपत्र प्रदान करतांना साहेब स्वतः त्या त्या व्यक्तीच्या कार्याबद्दल अभिमानाने माहिती देत होते. अतिशय व्यस्त वेळेत सुद्धा पोलीस प्रशासनातील एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याने तालुक्यातील सामान्यातील सामान्य माणसांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ असेल असे मला वाटते.

अतिशय व्यस्त असणाऱ्या या अधिकाऱ्याने स्वतः उपविभागातील अनेक गरजू लोकांपर्यंत मदतीचा ओघ पोहोचविल्याचे आपण सर्वजण जाणून आहतच. शिवाय Covid 19 च्या कालावधीत चांगले कार्य करणाऱ्यांची सुद्धा दखल घेतली. शिक्षक सुद्धा खूप चांगले काम करतात आणि चांगले काम करणाऱ्या शिक्षकांविषयी मला अतिशय अभिमान असल्याचे साहेबांनी बोलून दाखविताच उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याकडून शिक्षकांचे कौतुक ऐकताच उपस्थित शिक्षकांचे डोळे आनंदाने पाणावले. अतिशय आनंदाने व अभिमानाने साहेबांच्या हस्ते आम्ही आमचा सन्मान स्विकारला. उच्चपदस्थ पोलिस अधिकारी शिक्षकांशी असे वागू शकतात असा स्वप्नवत वाटणारा कार्यक्रम आम्ही अनुभवला.

      वर्दीतल्या माणसाने दर्दीपणा दाखवून केलेल्या सन्मानाबद्दल अद्वितीय अशा मा. श्री पुंडलिक सपकाळे (उपविभागीय पोलीस अधिकारी) साहेबांचे व केंद्रप्रमुख भैय्यासाहेब बिसनरीयांचे मनःपूर्वक धन्यवाद. . ! ?

सामाजिक अंतराचे नियम पाळत झालेला छोटेखानी कार्यक्रम चिरस्मरणात राहणार.

?
श्री. रविंद्र मोहन बडगुजर

श्री. रविंद्र मोहन बडगुजर यांना मिळालेल्या सन्मानाचा सर्व बडगुजर समाजास अभिमान आहे. अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपतर्फे आम्ही सरांचे हार्दिक अभिनंदन करतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*