कोरोना योद्धा सौ. कल्याणी बडगुजर आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीला घरी ठेवून बजावताय कर्तव्य.


कोरोनामुळे जगभरात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक माणसाच्या मनात कोरोनाविषयी भीती निर्माण झाली आहे. अशातच अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधिपरीचारिका सौ. कल्याणी किरण बडगुजर या आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीला घरी ठेवून कर्तव्यावर ठाम आहेत. त्यातच त्यांच्या सासूबाई यांच्या दोन्ही किडन्या निकामी होत असल्यामुळे त्यांना त्यांच्या सेवेत हजर राहावे लागते. घरातील पारिवारिक कठीण परिस्थिती, बाहेरिल कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळताना त्यातच त्यांना कर्तव्येही बजवावे लागते. आपल्या सर्वांसाठी अहोरात्र मेहनत घेणारे पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी व कोरोना युद्धात सहभागी असलेले सर्व सहभागी कोरोना योद्धा त्यात असलेले आपले समाज बांधव व सौ. कल्याणी बडगुजर यांना अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्यातर्फे यांच्या कार्याला व कर्तृत्वाला सलाम.
आपण सर्वांनी सहकार्य करुया, घरात राहुया , कोरोनाला हद्दपार करूया……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*