कु. स्वर्णिका बडगुजर “जनसेवा सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान अहमदनगर संचलीत,डाॕ. सी.व्ही.रामन बालवैज्ञानिक,२०२०च्या परिक्षेत,अमळनेर तालुक्यातून प्रथम – श्री. कल्पेश साळुंखे,पुणे

अमळनेर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब श्री.प्रकाश जानकीराम बडगुजर यांची नात व अमळनेरचे सुप्रसिध्द डाॕ.किरण व डाॕ.सौ.स्वप्नाली बडगुजर (महाफेड जळगांंवचे से.नि. एम. डी. श्री.आर. डी.बडगुजर,साळुंखे यांची कन्या) या डाॕक्टर मातापित्यांची कन्या कु.स्वर्णिका ही “जनसेवा सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान अहमदनगर संचलित डाॕ.सी.व्ही.रामन बालवैज्ञानिक परिक्षा २०२० च्या परिक्षेत अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. सदर परिक्षेत जळगांव जिल्ह्यातून १६४ विद्यार्थी होते त्यापैकी २७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकलेत(जिल्हा मेरीट मध्ये ४ तर तालुका मेरीटमध्ये २३) तसेंच अमळनेर तालुका १० + चोपडा तालुका १७ असे २७ विद्यार्थी मेरीटमध्ये चमकलेत.

कु.स्वर्णिका ही सेंट मेरी इंग्लीश मेडीयम स्कूल, अमळनेर इ.७वी ची विद्यार्थिनी असून ती अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कु.स्वर्णिकाने आपल्या यशाचे श्रेय आजीआजोबा तथा डाॕक्टर मातापित्याने दिलेने तिचे सर्वत्र कौतुक होत असून नातेवाईक, आप्तेष्ठ तथा बडगुजर समाजातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अखिल,भारतीय बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राउड गृप,वेब पोर्टल टीम,तथा चोपडा,पारोळा,अमळनेर,धुळे येथील बडगुजर समाज शैक्षणिक संस्थांतर्फे कु.स्वर्णिका,मातापिता व आजीआजोबांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा.
कु. स्वर्णिका बडगुजर

1 Comment

  1. श्री चंद्रकांत पितांबर बड गुजर ऐरोली नवी मुंबई
    May 17, 2020 at 6:39 am

    जनसेवा सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान अंतर्गत डॉ सी वी रमण बालवैज्ञनिक परीक्षेत कू स्वरनिका बड गुजर हिने मिळवलेल्या यशा बाबत मनपूर्वक अभिनंदन विज्ञान क्षेत्रातील ही अत्यंत उत्तुंग कामगिरी आहे तिच्या शैक्षणिक भावी वाटचालीस शुभेच्छा
    आई वडील व परिवाराचे मार्गदर्शन अतुलनीय धन्यवाद

Leave a Reply to श्री चंद्रकांत पितांबर बड गुजर ऐरोली नवी मुंबई Cancel reply

Your email address will not be published.


*