आजचा दिन विशेष ?‍?‍? जागतिक कुटुंब दिन – श्री. दिपक भिका बडगुजर, नाशिक

? कुटुंब… म्हणाल तर एक शब्द, मात्र विचार केला तर एखाद्यासाठी त्याचे संपूर्ण विश्व. जेव्हा संपूर्ण जग आपल्याविरुद्ध उभे असते, तव्हा फक्त कुटुंबच आपल्यामागे ठाम उभे असते.

? अशा या कुटुंबाला समर्पित म्हणून, दरवर्षी 15 मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस’ साजरा केला जातो.

? 1993 मध्ये, संयुक्त राष्ट्राचा ठरावाद्वारे दरवर्षी 15 मे हा कुटुंब दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

? कुटुंब अजूनही समाजातील एक मूलभूत घटक मानला जातो. युवकांमध्ये एकत्र कुटुंबपद्धती, संयुक्त कुटूंबाचे महत्त्व आणि आयुष्यात कुटुंबाची गरज याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी मे महिन्यात हा दिवस साजरा केला जातो.

? दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा एखाद्या थीमवर आयोजित करण्यास सुरुवात केली.

? तेव्हापासून बहुतेक थीम या मुलांचे शिक्षण, दारिद्र्य, कौटुंबिक संतुलन, सामाजिक समस्या अशा मुद्द्यांबाबत, जगभरातील कुटुंबांच्या कल्याणविषयी जनजागृती करण्यास मदत करत आहेत.

? आज जागितक कुटुंब दिनानिमित्त कोविड 19 पासून आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी निर्धार करा, असे महाराष्ट्र शासनाने ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

? कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं दुसरं जग व जीवन नाही, चला या जागतिक कुटुंबदिनी आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घेईन COVID 19 पासून सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करूया.

1 Comment

  1. छान लेख. आवडला./
    डा दिलीप बडगुजर सौ स्वाती
    अमरावती

Leave a Reply to Dr d d b Cancel reply

Your email address will not be published.


*